विवाहित महिलांसाठी खास वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे? किती दिवस? कसे करावे? सविस्तर जाणून घ्या

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू नयेत कायम आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण असावे, घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे, वादविवाद नसावी असे वाटत असते आणि त्यासाठी मग आपण अनेक प्रकारचे शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय हे करत असतो. तसेच आपल्या घरातील स्त्रिया देखील अनेक प्रकारचे व्रत उपवास करतात. जेणेकरून घरातील सर्व अडचणी दूर होतील.

तर आपल्यापैकी बऱ्याच महिला या लक्ष्मीचे म्हणजेच वैभव लक्ष्मीचे व्रत करताना तुम्ही पाहिले असेल. परंतु अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की वैभव लक्ष्मीचे व्रत हे कसे करायचे? किती दिवस आणि कशा पद्धतीने हे व्रत पूर्ण करायचे आहे? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तर या सर्वांचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे.

तर तुम्ही देखील जर वैभव लक्ष्मीचे व्रत करणार असाल तर ते तुम्ही 7, 11 , 21 किंवा 51 शुक्रवार करायचे आहे. म्हणजेच प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मी म्हणजे वैभव लक्ष्मीचा उपवास करायचा आहे आणि यांची विधिवत पूजा करायची आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्यातून येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मी मातेची पूजा करायची असते. तर तुम्ही सात शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार किंवा 21 शुक्रवार वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकता.

जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. पूजेची मांडणी किंवा पुस्तक वाचायचे नाही आणि तो दिवस देखील तुम्ही त्या आपल्या सात शुक्रवारच्या किंवा 21 शुक्रवारच्या वारी मोजायचे नाही. फक्त तुम्ही त्या दिवशी उपवास ठेवायचा आहे. हे व्रत करीत असताना तुम्ही तिखट किंवा मिठाचा वापर अजिबात करायचा नाही. तुम्ही फक्त त्या दिवशी फळे खायचे आहेत.

तसेच तुम्ही शुक्रवारी उपवास धरल्यानंतर वैभव लक्ष्मी मातेची पूजा विधी करायची आहे. म्हणजेच स्नान करून तुम्ही संध्याकाळी पूजेची मांडणी करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला पाठ मांडायचा आहे रांगोळी काढायचे आहे आणि त्या पाठावरती तुम्ही हिरवे, लाल किंवा केशरी रंगाचे कापड अंथरायचे आहे. त्यावरती तुम्ही जर वैभव लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तुम्ही तो ठेवू शकता किंवा मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे.

नंतर व्यवस्थित दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्हाला वैभव लक्ष्मी मातेची पोथी अवश्य मिळेल म्हणजेच पुस्तक मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेची कहाणी दिलेली आहे ती वाचायची आहे. अगदी मनोभावे, श्रद्धेने वाचल्यानंतर तुम्ही जो घरामध्ये जेवण केलेल आहे त्याचा नैवेद्य तुम्ही वैभव लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे.

असे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करायचे आहे. तुम्ही जर सात शुक्रवार हे व्रत करणार असाल तर सातव्या शुक्रवारी तुम्ही या व्रताचे उद्यापन करायचे आहे. म्हणजेच तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही वैभव लक्ष्मी मातेची पूजा करून घेता त्याप्रमाणे पूजा करून घ्यायची आहे पुस्तक वाचायचे आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्ही एखाद्या सुवासिनीला घरी जेवायला बोलवायचे आहे. म्हणजेच तुम्ही पाच किंवा सात किंवा एका तरी सुवासिनीला घरी बोलवून तिला जेवणास आमंत्रण करायचे आहे आणि नंतर तुम्ही तिला वैभव लक्ष्मी मातेची जे पुस्तक आहे ते पुस्तक देखील द्यायचे आहे आणि तसेच तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई देखील त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही खीर देखील त्यांना खाऊ घालू शकता.

तर अशा पद्धतीने तुम्ही वैभव लक्ष्मी मातेचे व्रत करायचे आहे. तुमच्या मनाप्रमाणे सात, 11, 21 शुक्रवार करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच सातव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी तुम्ही त्याचे उद्यापन करायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल. लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. सर्व अडीअडचणी नक्कीच दूर होतील. तर हे असे वैभवलक्ष्मीचे व्रत घरातील विवाहित स्त्रियांनी अवश्य करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment