चातुर्मासात ‘या’ गोष्टींचा त्याग केल्यास मिळतं पुण्य!

चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी म्हणजेच येत्या २९ जून २०२३ पासून होणार आहे. या दिवशी देवशयनी एकादशी आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूंसह सर्व देवगण योगनिद्रेत झोपी जातात.

देवशयनी एकादशीनंतर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. २९ जून २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२३ हा काळ चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जाईल. २३ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशीला देव झोपोतून जागे झाल्यावर पुन्हा एकदा शुभ कार्याला सुरूवात होईल. यंदा अधिक मास आल्याने चातुर्मास पाच महिन्यांचा असणार आहे. या काळात काही गोष्टींचा त्याग केल्याने श्रीविष्णू तुमच्यावर आशिर्वादरूपी हात ठेवतात. कोणत्या गोष्टी आहेत ज्या चातुर्मासात त्यागाव्यात ते आपण पाहूया.

चातुर्मासात काळे आणि निळे कपडे टाकावेत. असे मानले जाते की काळ्या आणि निळ्या कपड्यांचा त्याग केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते.

चातुर्मासात धातूची भांडी सोडून पत्रावळीवर जेवल्यास विशेष शुभ फळ मिळते. जर तुम्ही पत्रावळीत खाऊ शकत नसाल तर तुम्ही मातीची भांडी देखील वापरू शकता. जो मनुष्य चातुर्मासात फक्त दूध पिऊन किंवा फळे खाऊन राहतो, त्याची हजारो पापे नष्ट होतात.

शास्त्राच्या नियमानुसार या चार महिन्यांत ब्रह्मचर्य पाळल्यास तुमच्या मनात भक्तीची भावना वाढते. पानावरील अन्न खाल्ल्याने उपवास व मौन, जप, तप, दान व पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की जो व्यक्ती चातुर्मासात भक्तीभावाने किंवा प्रयत्नाने आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करतो, त्याला त्या त्याग केलेल्या वस्तू अक्षय स्वरूपात मिळतात.

पानाचा त्याग केल्याने माणसाला आनंद मिळतो आणि त्याचा आवाज मधुर होतो. चातुर्मासात गुळाचा त्याग केल्याने माणसाला गोडवा मिळतो. जो व्यक्ती दही सोडतो त्याला माधुर्य प्राप्ती होते. जे मीठ सोडतात त्यांना पुत्रप्राप्ती होते आणि जे मौन पाळतात त्यांची मुले त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत नाहीत.

Leave a Comment