राज्यात 4644 पदांसाठी तलाठी भरती ! असा करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

पदाचे नाव – तलाठी
विभाग – महसूल आणि वन विभाग
वेतनश्रेणी – S-8 : 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे – 4644

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी Talathi Bharti Recruitment Notification pdf या लिंकवर क्लिक करा. संपूर्ण जाहिरात वाचल्यावरच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा.

तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अर्हता

उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
परीक्षेचे स्वरुप

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील.
लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण सूचना

उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल.

अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट – mahabhumi.gov.in

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याची सुरुवात – 26 जून 2023 रोजी पासून
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत

परीक्षेची तारीख आणि कालावधी – mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल.

Leave a Comment