Wednesday, September 27, 2023
Homeराशी-भविष्य'या' राशींच्या संकटात होणार वाढ!

‘या’ राशींच्या संकटात होणार वाढ!

ज्योतिषशास्त्रात राहु, केतु, शनि आणि मंगळ या ग्रहांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. या ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. राहु आणि केतु एका राशीत दीड वर्षे राहतात. न्यायदेवता शनिदेव एका राशीत अडीच वर्षे, तर मंगळ ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. राहु ग्रह मेष राशीत, केतु ग्रह तूळ राशीत, तर शनि कुंभ राशीत आहे. असं असलं तरी या ग्रहांचा नक्षत्र परिवर्तनाचा कालावधी हा झपाट्याने बदलत असतो. 26 जून 2023 रोजी केतु ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे राशीचक्रातील पाच राशींना जबरदस्त फटका बसणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना सावध राहणं गरजेचं आहे.

मिथुन : या राशीच्या जातकांना केतु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा नकारात्मक परिणाम भोगावा लागू शकतो. खासकरून विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. तसेच मुलांच्या हट्ट करण्याच्या प्रमाणात वाढ होईल. तसेच त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करा. चुकीचं पाऊल उचलणार नाही यासाठी लक्ष ठेवाल.

कर्क : या राशीच्या जातकांवर केतु ग्रहाचं चित्र नक्षत्रातील भ्रमण थेट आरोग्यावर परिणाम करेल. यामुळे रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ येईल. आर्थिक स्थिती बिघडल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण राहील. काही कामासाठी विनाकारण पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.

कन्या : या राशीच्या जातकांना कौटुंबिक कलहाला सामोरं जावं लागू शकतं. जमिनीच्या वादामुळे घरातील वाद विकोपाला जाऊ शकतो. न्यायालयान प्रकरणामुळे डोकेदुखी वाढेल. तसेच काही चढ उतार या काळात अनुभवायला मिळू शकतात. लोकं तुमच्या पडत्या काळाचा गैरफायदा घेतील त्यामुळे अतीव दु:ख होईल.

मकर : या राशीच्या जातकांना सध्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. केतुच्या चित्रा नक्षत्रातील स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी ताण दिसून येईल. हाती घेतलेली काम झटपट पूर्ण होत नसल्याने चीडचीड होईल. तसेच केलेल्या कामात काही चुका निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मन शांत ठेवून चिकाटीने काम करावं लागेल. काही कारणास्तव समाजात मानसन्मान मिळणार नाही. तसेच नातेवाईकही बदनामी करण्याची संधी सोडणार नाहीत.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन