मित्रांनो 29 जून म्हणजेच गुरुवारच्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. सर्व एकादशीमध्ये या एकादशीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. ही खूपच मोठी एकादशी मानली गेलेली आहे. तर या देवशयनी आषाढी एकादशीला अनेक जण हे उपवास करीत असतात. अनेक पूजा विधी देखील करीत असतात. तर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी दिवशी जर काही उपाय केले तर यामुळे तुमच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. आरोग्य चांगले राहते. सर्व काही अडीअडचणी असतील त्या दूर होतात आणि आपले इच्छा देखील पूर्ण होते.
तर देवशयनी आषाढी एकादशीला नेमकी आपण कोणते उपाय करावे हे आता जाणून घेऊयात. तर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी दिवशी आपल्या देवघरातील श्री विष्णूंना केशर दुधाने अभिषेक करायचा आहे. म्हणजेच एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर टाकायचे आहे आणि या केशर दुधाने तुम्ही श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे किंवा जर तुमच्या देवघरांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल तर या मूर्तींना तुम्ही आषाढी एकादशी दिवशी अभिषेक घालायचा आहे.
तसेच तुम्ही श्रीविष्णू ना तसेच माता लक्ष्मीला सफेद रंगाची मिठाई याचा नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे. यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते. अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्ही हे उपाय जर केले तर तुमच्या नक्कीच जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही संध्याकाळी म्हणजे गुरुवारी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रत्येक प्रदक्षिणा घालित असताना ओम वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच अकरा वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. तसेच तुम्ही या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जाऊन तेथे एक नारळ अर्पण करायचा आहे.
म्हणजे तो नारळ तुम्ही फोडायचा नाही तर एक नारळ खरेदी करून तो तसाच त्या देवालयामध्ये ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हे जर तुम्ही छोटे छोटे उपाय जर देवशयनी आषाढी एकादशी दिवशी केले तर यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील किंवा मनातील इच्छा अपूर्ण राहिलेली असेल आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या असतील तर त्या सर्व समस्या नक्कीच दूर होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदेल.तर येणाऱ्या या गुरुवरच्या म्हणजेच 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशीला हे उपाय तुम्ही अवश्य करा.