मित्रांनो आपण कितीही काम केले किंवा आपण कितीही कष्ट केले तर आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही. आपल्याला किती जरी पगार असला तरी तो आपल्याला पुरत नाही.म्हणजेच की आपल्याकडून पैसे जास्त खर्च होतात. आपल्याला जास्त पगारअसुदे काय कमी पगार आपल्याला तो पुरतच नाही. कारण आज काल कोणती वस्तू घ्यायची म्हणले किंवा काही करायचे म्हणले तर पैशाशिवाय काही चालत नाही. पैसा आजकाल जीवन जगण्याचं एक कारणच बनलेला आहे. पैसा माणसे जवळ देखील करतो आणि पैसा मनसे दुरावतो देखील.
पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो खूप श्रीमंत आहे. असा मानलं जातं. तर मित्रांनो तुम्ही कितीही काम केला तर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील किंवा तुम्हाला तुमचे पैसे जास्त खर्च होत असतील तुमच्या पगरापेक्षा पेक्षा जास्त जर तुमचा खर्च होत असेल तर तो आपण कमी केला पाहिजे. व आपण आपला पगार थोडाफार तरी शिल्लक ठेवायचा पाहिजे.तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे की आपला पगार आपण कसा शिल्लक ठेवायचा. तर त्याचे दोन उपाय आहेत ते आता आपण जाणून घेऊया.
पहिला उपाय असा आहे की ज्या दिवशी आपला पगार होईल त्या दिवशी आपण काही सामान खरेदी करायचे नाही.किंवा आपण जर कोणाचे देणे द्यायचे असेल तर ते पैसे आपण द्यायचे नाहीत. आपला ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी आपण आपल्या पगारातला एकही रुपया आपण खर्च करायचा नाही. आपला पगार झाल्यानंतर ना आपण आपल्या देवघरांमध्ये ते ठेवायचे आहे. जर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या स्वामींच्या मूर्ती जवळ आपला पगार ठेवायचा आहे.
त्याच बरोबर जर तुमच्या घरामध्ये काही पैसे शिल्लक असतील ते देखील तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पूजा करतो .त्या दिवशी आपण त्यातले सव्वा रुपया किंवा पंधरा रुपये किंवा 25 रुपये आपल्याला त्यातून घ्यायचे आहे. त्याच्यातून किती पैसे काढले आहेत ते आपल्याला देवा जवळ असलेल्या एका डबी मध्ये ठेवायचे आहे.
तुमचे बाकीचे पैसे राहिलेले आहेत ते तुमच्या हातामध्ये घ्या व तुम्हाला एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. व एक माळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावाचा जप देखील करायचा आहे. सोळा वेळा तुम्हाला विष्णु गायत्री मंत्र देखील म्हणायचं आहे. सोळा वेळा लक्ष्मीनारायण मंत्र म्हणायचे आहे. व आणखी सोळा वेळा तुम्हाला नवार्णव म्हणायचा आहे.हे सर्व तुम्हाला जर म्हणायला जमत नसेल.
तर तुम्ही एक वेळेस श्री सुक्त म्हणला तरी देखील चालू शकतं. किंवा स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप देखील करू शकता. हे मंत्र किंवा हे जप झाल्यानंतर ना तुम्ही ते पैसे तुमच्या कपाटामध्ये ठेवा. किंवा जिथे तुम्ही ठेवत असाल तिथे ठेवा असे केल्याने तुमच्या पगारांमध्ये प्राप्ती होते. व तुमचा पगार महिना भर आहे तसाच टिकून राहतो.
दुसरा उपाय हा तुम्हाला बुधवारी सुरू करायचा आहे. हा उपाय तुम्हाला दहा दिवस करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक तांब्याचा कळस घ्यायचा आहे. तो चिंचेने किंवा लिंबाने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे. व एक पिंपळाचे पान टाका. कलश किंवा तांब्या आपल्याला आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. व त्याची सारखी आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे दहा दिवस त्याच्यामध्ये एक एक रुपयाचे नाणे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे.
कलशयामध्ये पैसे टाकायच्या अगोदर आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्याला आपल्याला एक वेळेस विष्णु गायत्री मंत्र म्हणायचा आहे. दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर ना त्या तांब्या मधून आपल्याला फक्त एक रुपया बाहेर काढायचा आहे. हा एक रुपया खूप शुभ असतो. हा एक रुपया तुम्ही पेंट करून तुम्ही तुमचे जिथे पैसे ठेवतात. त्या ठिकाणी एका डबी मध्ये हा एक रुपया ठेवायचा आहे. हा एक रुपया तुम्हाला कधीही खर्च करायचा नाही.जे बाकीचे उरलेले तांब्यामध्ये पैसे आहेत. ते तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या कोणत्याही कार्यासाठी वापरायचे आहेत.
तर मित्रांनो मी जे तुम्हाला दोन उपाय सांगितलेले आहे. ते तुम्ही योग्य प्रमाणे व श्रद्धेने भक्तीने केला तर तुमचा पैसा महिनाभर आहे तसाच राहणार आहे.व तुमच्याकडून वायफळ खर्च देखील होणार नाही.ही पूजा करताना मनापासून करायची आहे. म्हणजेच की जेणेकरून तुमचे पैसे आहेत असेच राहतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.