मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो, नवस बोलतो. मनोभावाने देवाची उपासन केली तर देव नक्की प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. काही लोक त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांना पाण्यात सुद्धा ठेवतात. परंतु मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण देवाला विसरून जातो आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर आपण त्याला धन्यवाद असे म्हणतो. त्याचप्रमाणे देवालाही धन्यवाद म्हणण्यासाठी विशेष पूजा-अर्चना केली पाहिजे. शास्त्रानुसार आयुष्यात येणार्या सर्व संकटांना दूर करण्यासाठी देवी-देवतांची उपासना करणे हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे.
आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानणे आवश्यक आहे आणि देवाची प्रार्थना फक्त अडचणीच्या काळातच करू नये. देवाची निस्वार्थ भावनेने सदैव प्रार्थना करावी, मंदिरात जावे त्याचबरोबर मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरावी आणि मित्रांनो जर मंदिरामध्ये देवीची ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये देवीची ओटी भरू शकता तर कशा पद्धतीने घरामध्ये देवीची ओटी भरायची आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेचच देवीची ओटी भरु शकता किंवा तुम्ही ओटी भरण्यासाठी कोणताही शुभ दिवस निवडू शकता मित्रांनो मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार या तीन पैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता.
आणि मित्रांनो तुम्ही लक्ष्मीची ओटी तुमच्या घरातच भरायची आहे खास करून विवाहित महिलांनीच भरायची असते अविवाहित लोकांनी ओटी भरायची नसते तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार यापैकी कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता सकाळी भरा संदयाकली भरा कोणत्याही वेळेस भरू शकता आणि ह्या ओटी मध्ये तुम्ही ब्लाउज पीस ठेऊ शकता किंवा नवीन कोरी साडी आणून ठेऊ शकता.
त्यानंतर नारळ आणून नारळ ठेऊ शकता ओटी भरण्याची सोपी पद्धत असते सगळ्यात आधी पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती लाल कापड टाकून स्थापन करायची लक्ष्मीच्या पाटावर काधिही सफेद कापड टाकू नये लाल रंगाचे कापड टाकावे.
आणि त्यानंतर तो फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी त्यानंतर साडी ब्लाउज पीस असेल तुम्ही ते पाटाच्या समोर ठेवायचे आहे साडी असेल तर साडी ठेव्हा त्यानंतर तुम्ही ५ ते ७ मुठ तांदूळ किंवा गव्हाचे त्या ओटी मध्ये टाकायचे आहे. जस तुम्ही इतर ओटी भरतात तस ते टाकल्या नंतर एक नारळ ठेवायचे त्यानंतर ११ रुपये किंवा २१ रुपये ठेवायचे तुम्हाला जो सौभाग्यच श्रुंगारचा सामान असतो तोही तुम्ही ठेऊ शकता काही लोक ठेव्हतात काही लोक नाही ठेव्हत तुम्हाला ठेव्हायचे असेल ठेऊ शकता किंवा नसेल ठेवायचे तर नका ठेऊ किंवा एखादे फळ केळी पण आणून ठेऊ शकता आशा रीतीने घरच्या घरी ती ओटी तुम्ही भरू शकता.
आणि जर गुरुवारी ओटी भरली तर ती ओटी रात्र भर तिथेच राहून द्याची देवी समोर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या नंतर पूजाची आवरा आवर केल्या नंतर ती ओटी तुम्ही तिथून उचलायची आहे आणि त्या ओटीतला नारळ तसाच ठेव्हायचा तो खायचा नाही तो कोणाला तरी दान करायचा किंवा कोणाला तरी देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता जे तांदूळ आणि गहू टाकले आहे ते तुम्ही गाईला खायला घालू शकता किंवा कोणत्या गरिबाला दान करू शकता आणि जी साडी ब्लाउज पीस असेल ते तुम्ही ज्या महिलांची ओटी भरली आहे त्या महिलेने वापरात घेतले तरी चालेल दक्षिणा सांभाळून कुठेतरी ठेऊन द्याचे त्या दक्षणाच्या नंतर तुम्ही देवासाठी काहीतरी समान विकत घेऊ शकता आशा रीतीने तुम्ही ती ओटी वापरू शकता आणि बाकी सगळे समान दान करायचे आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.