अनेकांना खूप प्रयत्न करूनही एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही. चांगली नोकरी आणि कमाई असूनही घरात पैसा टिकत नाही. कोणत्याही कार्यामध्ये सतत अनेक अडथळे येत असताता. अशा वेळी त्या व्यक्तीला पितृदोष असण्याची शक्यता असते.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार योग्य प्रकारे केले गेले नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियातील सदस्यांना पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. हे केवळ एकाच पिढीसाठी लागू होत नसून अनेक पिढ्यांचा याच्याशी संबध असतो.
ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्यांना असंख्य संकटांचा सामना करावा लागू शकतो. अशा व्यक्तिंना विवाह जुळण्यास अडचणी होतात. तसचं संतानसुख म्हणजे पूत्रपाप्तीसाठी देखील अडचणी निर्मांण होतात किंवा काही वेळेस दोष असलेल संतान जन्माला येतं. कुटुंबामध्ये सतत वाद आणि कलह निर्माण होतो. तसचं कुटुंबामध्ये सतत कुणी ना कुणी आजारी राहतं.
नोकरी किंवा व्यवसायात मोठी संकट येत राहतात.व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान सोसावं लागतं. तसचं पितृदोष असल्यास व्यक्तीला काही दुर्घटनांचा देखील सामना करावा लागू शकतो. पितृदोषामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्या तरी ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास पितृदोष दूर होवू शकतो.
तर पितृदोष दूर करण्यासाठी मृतव्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीनुसार गरजुंना आणि ब्राह्मणांना जेवण देऊन त्यांना तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या किंवा गरजुंना जान करा.
दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने दिवा लावावा. रोज शक्य नसल्यास पितृपक्षात लावावा.
दुपारच्या वेळी पिंपळाच्या झाडाला जल अर्ध्य अर्पण करावं. तसंच दूध, गंगाजल, काळे तील आणि फूलं अर्पण करावीत.
पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्ध्य द्यावं. रोज सकाळी उठल्यानंतर दक्षिणेला तोंड करून पितरांना नमस्कार करावा.पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी एखाद्या गरीब कुटुंबातील मुलाच्या विवाहास मदत करावी. गायदान केल्याने पितृदोषातून मुक्तता होते.
कापूराची वडी तूपामध्ये बुडवून प्रज्वलित करावी यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते.सोमवारी शिव मंदीरात जाऊन फूल, दही, बिल्वपत्र अर्पण करून पूजा करावी यामुळे पितृदोष दूर होतो.
घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर घरातील स्वर्गीय व्यक्तींचा फोटो लावून त्यावर चंदनाचा हार घालावा.
अशा प्रकारे काही साधे सोपे उपाय करून पितृदोष दूर करणं शक्य आहे.