हिंदू धर्मात कोणताही सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आषाढ महिन्यात होणारे गुप्त नवरात्र जवळ आले आहे. 19 जूनपासून गुप्त नवरात्री सुरू होत आहे. ज्या मुलींचे लग्न जुळण्यास विघ्न येत आहेत ते नवरात्रीच्या काळात काही उपायांनी या समस्येवर मात करू शकतात.
अशा मुलींनी गुप्त नवरात्रीत काही प्रभावी उपाय अवश्य करावे. अशा अनेक तरुणी आहेत ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात. अनेकांची लग्न जुळता जुळता तुटतात. अशा मुलींनी गुप्त नवरात्रीत माता दुर्गाला श्रृगांर साहित्य अर्पण करावे. यासाठी आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करून माता दुर्गेची भक्तिभावाने पूजा करावी आणि श्रृगांर साहित्य देवीला अर्पण करावे.
गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढील 40 दिवस माता कात्यानीची पूजा करा. पूजेदरम्यान ‘ओम कात्यायनी महामाये महायोगिन्याधीश्वरी’ या मंत्राचा जप करा. यामुळे लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला योग्य वर मिळेल.
राहू-केतूमुळे वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर पूजेच्या वेळी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. यामुळे लवकर विवाह होतो.
गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गाला रोज नऊ लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. यासाठी तळहातावर फुले ठेवा आणि लवकर विवाहाची इच्छा ठेवा. या दरम्यान “ओम श्री वर प्रदाय श्री नमः” या मंत्राचा जप करा. यानंतर माँ दुर्गाला फुले अर्पण करा. त्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होऊ लागते.
विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी गुप्त नवरात्रीमध्ये स्नान आणि ध्यान केल्यानंतर माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करा. यावेळी माता पार्वतीला लवकर लग्नाची कामना करावी.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी उगवत्या तिथीनुसार 19 जून आहे. या दिवशी नवरात्रीची सुरुवात होत आहे. या दिवशी पहाटे 5.23 ते 7.27 हा काळ कलश स्थापनेसाठी शुभ मानला जातो.