मित्रांनो स्वामींनी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जीवनाबद्दल सांगितल्या आहेत जसे कि आयुष्यात कसे जगावे, आयुष्यात आणि कसे राहायचं आणि आनंदात व सुखासमाधानाने कसे जगायचं. स्वामी जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आपल्या भक्तांना आणि त्याच जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला खूप गोष्टी माहितीच असतील आणि माहिती नसेलच एखादी गोष्ट तर आपल्या ह्या आजच्या लेखामध्ये तुम्हाला कळूनच जाईल.
चला तर पाहुयात असे ते कोणते ५ नियम आहेत ज्यांचे तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये पालन करा व ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य आनंदी व सुखसमाधानचे घालवाल. तुमच्यावर कोणतेही संकटे अडीअडचणी कधीही येणार नाहीत जर तुम्ही फक्त हे ५ नियमांचे पालन केले तर.
श्री स्वामी समर्थानी सांगितलेला पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत कधीच करू नका, कारण तुम्ही एखाद्याची तुलना करायला जाणार आणि तुम्ही तुमच्याच अडचणी वाढवून बसाल. त्यामुळे तुम्ही कधीही कोणासोबतही तुलना करू नका आपल्या कडे जे काही आहे त्यात नेहमी समाधानी रहा व त्यात कशी प्रगती करता येईल त्याकडे लक्ष द्या, तुम्ही नक्की पुढे जाल यशस्वी होचाल.
दुसरा नियम आहे तो म्हणजे जास्त विचार कारण बंद करा कोणत्याही गोष्टीचा आपण जस्ट विचार केल्याने आपलाच वेळ जातो आणि साध्य तर मात्र काहीच नाही होत. म्हणून एखाद्या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा व टेन्शन घेण्यापेक्षा तसे करू नका.
तिसरा नियम आहे भूतकाळतल्या नको त्या गोष्टीवर विचार करणे टाळा. खूप लोक अशी आहेत जी काल काई झालं ह्याच गोष्टींचा इतका विचार करत बसतात कि ते आता काई चालू आहे किंवा आताच पूर्ण वेळ वाया घालवून टाकतात. म्हुणुन जे झालं ते विसरून नव्याने आता काई करता येईल ह्याचा जास्त विचार केला पाहिजे.
स्वामींचा चौथा नियम आहे, दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात ह्याचा तुही विचार करू नका. दुसरे तुम्हाला काई बोलतील, त्यांना काई वाटेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या कोणाला काही वाटेल ह्याची पर्वा न करता जेही तुम्हाला मनाला वाटेल तसे जगा.
पाचवा व शेवटचा नियम आहे सतत आनंदी राहा. प्रेत्येकाने जीवनात नेहमी आनंदी राहले पाहिजे आनंद नाही तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही. तर मित्रानो हे स्वामींनी सांगितलेले पाच अतिशय सरळ आणि साधेसोपे नियम आहेत ह्या नियमांचे पालन जर तुम्ही केले तर तुम्ही जिवंत नेहमी यशस्वी होचाल.