हिंदू धर्मीय लोकांच्या घरात एक देव्हारा असतोच. देव्हाऱ्यात विविध देवतांची नित्य पूजा केली जाते. सगळ्यांच्या घरी पूजा करण्याची पद्धत सर्वसाधारणपणे सारखीचे असते.
पण, नित्य पूजा करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. धार्मिक ग्रंथांनुसार सांगितलेल्या नियमांचे पालन केल्याने घरातील संकटे, गरिबी दूर होतेच. त्यासोबत उत्पन्नाचे स्रोतही वाढतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. देव्हाऱ्याशी संबंधित महत्त्वाचे 7 नियम कोणते आहेत ते जाणून घेऊया.
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील देव्हारा दर शनिवारी नियमितपणे पूर्ण स्वच्छ केला पाहिजे. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते, तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी देव्हाऱ्याची स्वच्छता केल्यानंतर शुद्धीकरणासाठी गंगाजल शिंपडावे.असे केल्याने लक्ष्मीचा वास होतो आणि नकारात्मकता दूर होते. पूजेच्या वेळी दिवा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. दिव्याशिवाय देवतेची पूजा अपूर्ण मानली जाते.
नेहमी दिवा लावण्यापूर्वी तो पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतरच दिव्यात ज्योत प्रज्वलित करावी. देव्हाऱ्याची साफसफाई गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी करू नये. असे केल्याने देवतांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.
देव्हाऱ्याची साफसफाई करत असताना मूर्तींना खाली काढून थेट जमिनीवर ठेवू नये. एखादे भांडे किंवा उंच स्थानावर ठेवावे.
देव्हाऱ्यातही देव नेहमी स्वच्छ कापडावर किंवा उंच जागेवर ठेवावेत. लक्षात ठेवा की पूजा केल्यानंतर नेहमी देव्हारा पडद्याने झाकून ठेवावा. ज्योतिषशास्त्रानुसार पूजा करताना कापूर लावावा.
घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष तर दूर होतातच शिवाय पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहते, असे मानले जाते.