मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी हे आहेत. प्रत्येक भक्त अगदी मनापासून भक्ती भावाने स्वामींच्या सेवेमध्ये लीन होऊन जातात. जेणेकरून आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्या सोबत राहतील. तसेच आपल्या संकटातून, त्रासातून नक्कीच बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक भक्ताला आपल्या स्वामींवर असतो. तर मित्रांनो तीन जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि मी तुम्हाला आज एक लाल दोरा सांगणार आहे हा लाल दोरा तुम्ही आपल्या घरामध्ये म्हणजेच देव घरात ठेवायचा आहे.
मित्रांनो हा लाल दोरा म्हणजेच आपण पूजा हवन तसेच कोणत्याही शुभकार्यात वापरतो असा हा लाल दोरा किंवा केसरी रंगाचा दोरा किंवा केसरी लाल असा मिक्स असणारा दोरा देखील तुम्ही खरेदी करून आणायचा आहे आणि तो आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. तर तुम्ही हा दोरा जो आहे हा दोरा आपल्या देवघरांमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसात ठेवायचा आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला आपल्या देवघरांमध्ये तो दोरा असाच ठेवायचा आहे.
गुरुपौर्णिमेला आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये बांधायचा आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या घरातील जेवढे सदस्य असतील त्यांना पुरेल इतका दोरा तुम्ही खरेदी करून आणायचा आहे. देवघरांमध्ये आणून तो दोरा ठेवल्यानंतर तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ एका मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला दोन्ही वेळेस जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एका कोणत्याही वेळेस जप करू शकता.
म्हणजे सकाळची पूजा आटोपून झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र बोलायचा आहे. नंतर आपण जी उदबत्ती लावलेली असते ती उदबत्तीची जी उदी असते ती उदी तुम्ही त्या दोऱ्यावरती लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. असे तुम्ही तीन जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत सलग करायचे आहे आणि गुरुपौर्णिमेला सकाळी तुम्ही श्री स्वामी समर्थांय नम: मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर तो दोरा घेऊन आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या हाती तो दोरा बांधायचा आहे.
तर आपल्या घरातील महिलांनी आपल्या डाव्या हाताला हा दोरा बांधायचा आहे आणि घरातील पुरुषांनी आपल्या उजव्या हाताला हा लाल दोरा बांधायचा आहे. मित्रांनो असा हा दोरा जर तुम्ही आपल्या हाती बांधला तर यामुळे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुमच्या प्रत्येक संकटात तुमची साथ देतील. हा दोरा तुम्ही अजिबात आपल्या हातातून काढायचा नाही.
तर पुढच्या वर्षी ज्यावेळेस गुरुपौर्णिमा येईल त्याच्या अगोदर परत तुम्हाला दोरा खरेदी करून आपल्या देवघरात ठेवायचा आहे. पूजा वगैरे करायचे आणि गुरुपौर्णिमेला परत आपल्या हातातील दोरा काढून तो नवीन दोरा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या देवघरांमध्ये लाल दोरा गुरुपौर्णिमेच्या अगोदर तुम्ही आठ दिवस, पंधरा दिवस आणू शकता आणि आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि तीन जुलैला गुरुपौर्णिमेला तो दोरा आपल्या हाती बांधायचा आहे. त्यामुळे आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतील. आपल्या प्रत्येक संकटातून ते आपली सुटका देखील करतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.