Saturday, September 30, 2023
Homeराशी-भविष्य'या' तीन राशीच्या लोकांसाठी चालू आठवडा असणार भरभराटीचा!

‘या’ तीन राशीच्या लोकांसाठी चालू आठवडा असणार भरभराटीचा!

मिथुन राशी: सप्ताहात आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल.नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील.

संतती स्थानातील चंद्रभ्रमणात संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. सप्ताह उत्तम राहिल. एखादया विपरित घटनेतून लाभ होणाच्या योग आहे. कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. वाहन व घर खरेदीस अनुकूल वातावरण राहील.

नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. आर्थिक स्त्रोत वाढेल.

चंद्रबल शुभ तारीखः १२, १४, १५, १६.

कन्या : सप्ताहात आपल्याला व्यापारात मोठे यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.

आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडांकडून आर्थिक सहकार्य मिळेल.

चंद्रबल शुभ तारीखः १३, १५, १७, १८.

धनुः सप्ताहात मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. मनोबल कमालीचे उंचावलेल असेल. व्यवसाय कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल.

जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल.

व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनशांती लाभेल. वाहन,घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल.

चंद्रबल शुभ तारीखः १४, १६, १७ , १८.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन