ज्योतिष शास्त्रानुसार, ठराविक अंतरानंतर प्रत्येक ग्रहांचं संक्रमण आणि राशी परिवर्तन होतं. यामुळे अनेकदा त्रिग्रही योग (Trigrahii Yog) आणि राजयोग निर्माण होतात. याचा प्रभाव सर्व मानवी जीवनावर होतो. त्यानुसार, काही योग (Yog) काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात सूर्य, शनी आणि शुक्र ग्रहांचा शुभ संयोग जुळून येणार आहे. हा संयोग तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचा सुवर्ण काळ सुरु होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
त्रिग्रही योग जुळून आल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना याचा चांगला आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. या राशीच्या नवव्या चरणात हा योग विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगला भागोदय मिळेल. तसेच, धार्मिक आणि शुभ कार्यात तु्म्हाला सहभागी होता येईल. जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांची चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरच्या एका नव्या टप्प्यावर तुम्ही पोहोचाल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही फार व्यस्त असाल. तितकाच तुम्हाला आनंद देखील मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
त्रिग्रही योग जुळून येणार असल्यामुळे हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण झालेली पाहायला मिळतील. नोकरदार वर्गातील लोकांना करिअरमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. विस्तार अधिक मोठा होईल.