होळीच्या दिवशी अग्नीत ‘या’ 5 गोष्टी अर्पण केल्यास लवकरच लग्नाचा योग जुळून येणार, जाणून घ्या उपाय

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मात चांगल्याने वाईटावर मात करण्याची कहाणी हिरण्यकश्यपूच्या कथेत रुजलेली आहे. तर अशा अनेक कथा आहेत. पण यामागचा हेतु म्हणजे होळीच्या दिवशी चांगल्या पद्धतीने वाईटावर मात हा होय. यासाठी होळीचा सण साजरा केला जातो. रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळीचा सण साजरा होत असतो. त्याचबरोबर होळीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. तसेच ज्या लोकांचे लग्न जमवण्यात काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी अग्नीत पाच गोष्टी अर्पण केल्याने लग्न लवकर होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच अडचणी देखील दुर होतात. अशाप्रकारे या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

 

या वर्षी होळीचा सण कधी साजरा केला जाणार?

या वर्षी फाल्गुल महिन्याची पौर्णिमा तिथी 13 मार्च रोजी सकाळी 10:35 मिनिटांनी सुरू होईल. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी दुपारी 12:23 मिनिटांनी संपेल. त्यामुळे होळी हा सण 13 मार्च रोजी साजरा केला जाईल. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाते.

 

होळीच्या दिवशी अग्नीत या पाच गोष्टी अर्पण करा

तुप अर्पण करणे

 

तुम्हाला जर लग्न जुळवण्याकरिता काही अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी जेव्हा होळीची पुजा केल्यांनतर होळी पेटवली जाते तेव्हा हवन साहित्यात तूप मिसळून ते अग्नीत अर्पण करा. हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की असे केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात. तसेच लग्नाचा योग लवकर जुळून येतो.

 

पाच हळकुंड अर्पण करणे

 

लग्न जुळताना काही अडचणी येत असतील तर पाच हळकुंड घेऊन होळी भोवती एक प्रदक्षिणा पुर्ण करा. त्यानंतर हे पाच हळकुंड पेटत्या होळीत अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात. तसेच, लवकर लग्न होण्याची शक्यता असते.

 

नारळ अर्पण करणे

 

होळीच्या दिवशी एक नारळ घेऊन त्याला पुजेसाठी वापराला जाणारा लाल धागा गुडांळून घ्या. त्यांनतर हा नारळ ज्या व्यक्तीचे लग्न जमवताना काही अडचणी येत आहेत त्यांच्या डोक्यावरून सात वेळा हा नारळ फिरवून पेटत्या होळीत अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर जमते.

 

तुपात भिजवलेल्या 108 वाती

 

होळीच्या दिवशी पेटत्या होळीत तुपात भिजवलेल्या 108 वाती अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्यां टळतात.

 

सुपारी अर्पण करणे

 

तुमचे लग्न जमत नाही किंवा खूप उशीर होत असेल तर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यावर त्यात सुपारी टाका. असे केल्याने, विवाहात उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते.

Leave a Comment