नवीन वर्षात होलिका दहन नेमकं कधी असणार? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शुभ योग

हिंदू धर्म मान्यतेनुसार, 2025 या नवीन वर्षाची यंदाची होळी 14 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.

तर, होलिका दहन 13 मार्च रोजी गुरुवारच्या दिवशी असणार आहे. होलिका दहन नेहमी होळीच्या आधी केलं जातं. तसेच, होलिका दहन भद्राकाळात करणं शुभ मानलं जात नाही.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यानुसार, 13 मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. तर, भद्रा काळ रात्री 10.30 वाजता समाप्त होणार आहे.

पंचांगानुसार, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 26 मिनिटांपासून ते 12.30 मिनिटापर्यंत असणार आहे. जवळपा 1.04 मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे.

या दिवशी धृति योग, शूल योग असणार आहे. धृति योग – दुपारी 01.03 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, शूल योग पुढच्या दिवशी 14 मार्च शुक्रवारी दुपारी 01.23 मिनिटांपर्यंत असणार आहे

धृति योगाचा काळ फार शुभ काळ असतो. या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात. होलिका दहन आणि होळीच्या दिवशी जुळून येणारा दुर्लभ शूल योगाच्या दरम्यान होलिका दहन केलं जातं.

Leave a Comment