होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्ज मुक्ती… 

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की सगळ्या प्रकारची सोंग माणूस घेऊन शकतो. परंतु पैशाचे सोंग तो घेऊ शकत नाही. सर्व सामान्य माणसांच्या जीवनात तर त्यांनी करत असलेल्या कामाचे त्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्यामुळे ते आपल्या जीवनावश्यक गरजा देखील येणारा मोबदलातून भागवू शकत नाहीत. म्हणून त्यांना इतरांकडून उधार पैसे घ्यावे लागतात. म्हणजेच कर्ज घ्यावे लागते. 

 

जे ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये परतफेड करत असतात. जर आपल्याला असे वाटत असेल की, आपण कर्जमुक्त झाले पाहिजे. कोणत्याही कर्ज आपल्या वर नको. यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण एक उपाय पाहणार आहोत की, जो उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करावा? हा उपाय साठी लागणारी वस्तू कोणकोणती? याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येकाच्या जीवनावर कोणते ना कोणते संकट हे येतच असते. या संकटांमध्ये आपण काही वेळा आर्थिक परिस्थितीत देखील सापडू शकतो. यावेळी आपण कर्जबाजारी देखील होऊ शकतो. म्हणून अशावेळी लोक मंत्र तंत्र, तोडगे यांचा तसेच ज्योतिष शास्त्रातील उपायांचा अवलंब करत असतात. की जेणेकरून आपल्यावरील कर्ज हे लवकरात लवकर पिटेल.

 

ते कर्जाचे ओझे लवकरात लवकर आपला खांदावरून दूर होईल. यासाठीच आज आपण एक उपाय पाहणार आहोत की, जो उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. होळीच्या दिवशी आपल्याला एक पिठाचा पंचमुखी दिवा तयार करायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे आहे. एक चिमूटभर काळे तीळ, एक चिमूटभर कुंकू व अक्षदा घालायच्या आहेत.

 

त्यानंतर त्यामध्ये कापसाची वात तयार करून हा दिवा प्रज्वलित करा. हा प्रज्वलित केलेला दिवा आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. हा दिवा अर्पण करत असताना होळीला आपण प्रार्थना करायची आहे. की आपल्यावर असलेले आर्थिक संकट लवकरात लवकर दूर व्हावे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पैसे मिळवण्याचे मार्ग उपलब्ध व्हावे.

 

आपले कर्ज कमी व्हावेत. अशी ही होळीला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला होळीमध्ये अर्पण करून पाठीमागे वळून न पाहता सरळ घरी परत जायचे आहे. घरी परतल्यानंतर आधी हात पाय धुवून मगच घरात प्रवेश करावा. असा हा उपाय आपल्याला होळीच्या दिवसापासून सुरू करून महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला केला तरी चालतो.

 

अमावस्याला उपाय करत असतात हा दिवा प्रज्वलित करून चार रस्ते असलेल्या ठिकाणी तो दिवा मधोमध ठेवावा. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही चालू ठेवला तरी देखील चालू शकतो. नक्कीच तुमच्यावर आलेले कार्तिक संकट दूर होईल. हळूहळू तुमचे कर्ज कमी होण्यास सुरुवात होईल. व तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. तुमच्यावर जर आर्थिक संकट असेल तर, नक्कीच ते दूर होईल व तुम्ही कर्जमुक्ती लवकरात लवकर होईल.

Leave a Comment