ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीत केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 16 March 2024) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
विद्यार्थ्यांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल. काही दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेल्या समस्येवर उपाय सापडेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती आज पूर्ण होणार आहेत.
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज योजना आखून एखादे काम कराल आणि मेहनतीचा संपूर्ण फायदा मिळेल. योजलेली सर्व कामं आज पूर्ण होतील. आज एखाद्या चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. उत्पन्न मिळवण्याच्या, कमाईच्या अनेक संधी मिळतील.
मिथुन
मन स्थिर नसल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल, परंतु तुमच्या प्रियजनांच्या मदतीने तुम्हाला दिलासा मिळेल. कार्यालयात आज तुमचे काम लक्षणीय वाढू शकते. जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. एखाद्यासोबत वादही होऊ शकतो. तुम्ही जे प्रयत्न व्यर्थ मानले होते ते आज यशस्वी होतील. आज तुम्हाला काही सामाजिक कार्यक्रमासाठी जावे लागेल.
कर्क
आज तुम्ही विचारांमध्ये मग्न असाल. जे संगणक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना आज त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात अडथळे येऊ शकतात. तुमच्या यशाच्या आड इतरांना येऊ न देणे इष्ट. आर्थिक बाबींबाबत आज तुमची एखाद्याशी मनोरंजक चर्चा होऊ शकते. आज तुमच्या तब्येतीत काही चढ उतार असतील.
सिंह
आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज एखादी मोठी ऑफर मिळाल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. साहित्य क्षेत्राशी संबंधित या राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुम्हाला वेळेवर मदत मिळेल. या
कन्या
आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कोणतेही प्रलंबित काम आज सहज पूर्ण होईल. आज ऑफिसमध्ये वरिष्ठांशी बोलून तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक वातावरणही आज आनंददायी राहील. आज अनेक चांगल्या बातम्या देखील ऐकायला मिळू शकतात.
तूळ
आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला अस्वस्थ वाटेल, अशा परिस्थितीमध्ये, अशा ठिकाणी जाणे टाळा. तुमचा विचार सकारात्मक ठेवा आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकणे टाळा. तुम्ही काही नवीन काम सुरू करत असाल तर आज दिवसभर तुम्ही व्यस्त राहू शकता. आज कोणतेही पाऊल उचलण्यात घाई करू नका. आज कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचारपूर्वक बोला.
वृश्चिक
आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. आज तुम्हाला जोडीदाराकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही घरी काही कार्यक्रम आयोजित करू शकता किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांना आज मुलाखतीमध्ये नक्कीच यश मिळेल. तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल.
धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. जे माहिती प्रसारण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. आज आर्थिक बाजू मजबूत राहील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र करिअरबद्दल थोडी चिंता वाटू शकते.
मकर
आज तुमचा चांगला जाईल. ज्या संधीचा तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होता, ती संधी आज तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मिळू शकते. तुमचा बॉस आज तुमच्या कामावर खूश असेल. तुमची विशेष कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.
कुंभ
आजचा दिवस उत्तम असेल. आज तुम्हाला काही खास काम करायचे असेल तर ते जरूर करा, त्यात नक्कीच यश मिळेल. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रत्येक काम काळजीपूर्वक केल्यास चांगले होईल. या राशीच्या कलाकारांसाठी आजचा दिवस विशेष चांगला आहे.त्यांना समाजात नाव कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात.
मीन
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. खर्च वाढू शकतो. तुम्ही कामाच्या बाबतीत थोडे आळशी राहाल. जुन्या व्यवहारांकडे आज दुर्लक्ष करू नका. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. जोडीदारांमध्ये सुसंवाद राहील. वकिलांसाठी आजचा दिवस दिलासादायक असेल, ते जुनी केस जिंकू शकतात.