न्यायदेवता शनीदेव येत्या ५ जूनला वक्री होत प्रवास सुरु करणार आहे. १७ जूनला शनिदेव पूर्ण वक्री अवस्थेत असतील. ज्यामुळे ३० वर्षांनी शनीदेव स्वराशीत असतानाच एक अत्यंत शुभ योग जुळून येणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनीची मूळ त्रिकोण रास ही कुंभ आहे. सध्या शनीदेव कुंभ राशीतच असल्याने या त्रिकोण राशीतच वक्री होत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.
शनी २०२५ पर्यंत कुंभ राशीतच असणार आहेत. तोपर्यंत काही राशींच्या भाग्यात प्रचंड मोठ्या प्रगतीचा योग आहे. तसेच पगारवाढीसह या राशी आपले समाजातील स्थान व जीवनशैली सुधारू शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहूया…
मेष राशी
मेष राशीच्या मंडळींना शनीच्या वक्री चालीची प्रचंड मोठी मदत होऊ शकते. केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने या राशींची आर्थिक चणचण कमी होऊ शकते. तुमचे केंद्रित विचार तुम्हाला प्रगतीच्या पथावर नेऊ शकतील. काही प्रलंबित समस्या दूर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तुम्हाला नोकरीसह काही अन्य माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धार्मिक कार्यातील सहभाग वाढून मानसिक शांतता व स्वतःशी ओळख होण्याची चिन्हे आहेत.
वृषभ राशी
शनी वक्री झाल्याने वृषभ राशीत केंद्र त्रिकोण राजयोगाचा शुभ प्रभाव पडू शकतो. वृषभ राशीच्या मंडळींना बंपर लाभ देणारी एखादी नामी संधी मिळू शकते. तुम्हाला भावंडांची अनपेक्षित साथ मिळू शकते. नव्या नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो आणि सर्वात फायद्याची बाब म्हणजे तुमची आर्थिक मिळकत दुपट्टीने वाढू शकते. तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्या वाढून काहीसा तणावाचा काळ अनुभवावा लागू शकतो.
मिथुन राशी
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.