मित्रानो, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करताना कलश बसवण्याची परंपरा आहे. त्यात नारळ, तांदूळ, पाणी हे वापरले जाते. अनेक घरांमध्ये जिथे कलश बसवलेला नाही, तिथे नऊ दिवस देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ नारळ ठेवला जातो.
आता प्रश्न असा पडतो की, नवरात्रीनंतर कलशावर किंवा मूर्तीजवळ ठेवलेल्या नारळाचे काय करायचे? खरं तर, असे मानले जाते की जर या नारळाची योग्य प्रकारे वापल केला नाही तर देवीचा कोप होऊ शकतो. याशिवाय, तुमच्या 9 दिवसांच्या पूजेचे फळ मिळण्यात अडचण येऊ शकते.नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केली जाते आणि माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
कलश बसवताना त्यावर नारळ ठेवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण सर्व विधी करून कलशाची प्रतिस्थापना करतो, त्याचप्रमाणे कलश काढताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे न केल्यास माता दुर्गा रागावू शकते आणि नऊ दिवस केलेल्या उपासनेचे फळ आपल्याला मिळत नाही, अशी धार्मिक धारणा आहे.
नवरात्रीनंतर आपण कलशावर ठेवलेला नारळ लाल कपड्यात बांधून आपल्या पूजेच्या खोलीत ठेवू शकतो. असे मानले जाते की असे केल्याने देवी आपल्या भक्तांना वर्षभर आशीर्वाद देते. तसेच देवी आपल्याला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते.
नारळ लाल कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दरवाजावर बांधता येतो. नंतर पुढच्या नवरात्रीनंतर आधीचा बांधलेला नारळ नदीत समर्पित करावा आणि त्या जागी नवरात्रीनंतर कलशातून काढलेला नारळ त्याच प्रक्रियेने बांधावा.
जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही तो नारळ तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही ठेवू शकता. यामुळे व्यवसायात भरभराट राहते. नवरात्रीमध्ये पारणावरील कलश काढून टाकल्यानंतर नारळाचा प्रसाद कुटुंबातील सदस्यांमध्येही वाटता येईल किंवा कलशातील नारळ नदीत वाहवता येईल.
घटस्थापनेवेळी अक्षता (तांदूळ) कलशाखाली ठेवतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कलश काढल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तांदूळ शिंपडावे. हिंदू धर्मात तांदूळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घरात कलशाखाली ठेवलेला तांदूळ शिंपडल्याने कधीही आर्थिक तंगी होत नाही. तसेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधानी राहते.
कलश काढल्यानंतर त्याचे पाणी घरात सर्वत्र शिंपडावे. सदस्यांवरही पाणी शिंपडावे. जर तुम्ही व्यापारी असाल तर ते पाणी व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा. शेतकरी असाल तर शेतात पाणी शिंपडा नाहीतर तुम्ही लावलेल्या रोपांना पाणी टाका असे केल्याने सुख-समृद्धी टिकून राहते. याशिवाय नवरात्र संपल्यानंतर पूजा साहित्य नदीत अर्पण करता येते. असे मानले जाते की असे केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष येत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते.