२४ ऑक्टोंबर दसऱ्याच्या दिवशी नक्की करून पहा हा उपाय आयुष्य सुखी होईल!

मित्रांनो 24 ऑक्टोबर मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आली आहे विजयादशमी. ह्या विजयदशमीस दसरा देखील म्हणतात. वर्षांतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. ह्या दिवशी केलेले काही उपाय आपल्या जीवनातील समस्या दूर करतात शत्रूबाधातुन आपल्याला मुक्ती मिळते. तसेच धन, पैसे वैभव घराची बरकत वाढवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करता येतात आणि मित्रांनो विजयदशमीच्या दिवशी सकाळी आपण उठून आपण आपल्या घराच्या दरवाजावर थोडेसे गंगाजल अवश्य शिंपडा.

मित्रांनो आपला घराचा मुख्य दरवाजा, त्याची जी चौकट आहे त्यावरती आपण थोडे गंगाजल टाका जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध पाण्यात चिमूटभर हळद टाकून आपण हे असे हळदीयुक्त जल आपण ह्या आपल्या मुख्य दारावर व चौकटीवर शिंपडायचे आहे आणि मित्रांनो आपल्या घराची अंगणाची साफसफाई केल्यानंतर आणि स्वच्छ अंघोळ केल्यानंतर आपल्या घराचा जो उंभरठा आहे त्या उंबरठयावरती माता लक्ष्मीची पाऊले काढावीत. हि पाऊले घरात आत येणारी असावीत. दसरा आहे आणि ह्या शुभ मुहुर्तावरती आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत आहे. ह्या शुभ मुहूर्तवरती आपण मातेच्या स्वागतासाठी सज्ज व्हयला हवे.

आणि ह्या दिवशी आपण झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची तोरणे करतात असे हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला अवश्य लावा. कारण ह्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आणि आंब्याची पाने लावताना सात, नऊ, अकरा अश्या पद्धतीने लावली तर आपल्याला फळे आणखीनच चांगली मिळतात. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण थोडासा गुलाल सुद्धा टाकू शकता तसेच चौकटीला थोडासा गुलाल देखील टाकू शकता.मित्रांनो हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात. आपण ह्या दिवशी फरशी पुसताना थोडेसे खडे मीठ आपण अवश्य त्या पाण्यात टाका सोबतच आपण तुरटी सुद्धा आपण त्या पाण्यात फिरवू शकता.

आणि अश्या पद्दतीने आपण फरशी पुसावी हयामुळे आपल्या घरातील सर्व नाकारात्मक शक्ती घरातून निघून जाते. त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक उपाय म्हणजे आपण ह्या दिवशी सकाळी उठून एका वाटीत कुंकू टाकून त्यात आपण थोडेसे मोहरीचे तेल त्यात टाकून मिक्स करा व अश्या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बरोबर मध्यभागी एक स्वस्तिक रेखाटा.

स्वस्तिकमध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो म्हणून असे स्वस्तिक आपण काढायचे आहे व त्या स्वस्तिकाच्या उजव्या व डाव्या बाजूला आपण दोन उभ्या दांड्या देखील काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात जी माता लक्ष्मी जी अली आहे ती घरात टिकून राहील.

विजयादशमीच्या दिवशी आपण नवीन वस्त्रे परिधान करावीत ज्यांना शक्य आहे त्यांनी गोरगरिबांना वस्त्रे दान द्यावीत. तसेच ह्या दिवशी आपण अन्नदान करावे अन्नदानामुळे समोरची व्यक्ती जर तृप्त झाली तर तिच्या आशीर्वादाने घरातील मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. आपण दान म्हणून दक्षिण देखील देऊ शकता.

ज्या दिवशी मातेचे आगमन आपल्या घरात होत आहे त्या दिवशी घरात आनंदमय वातावरण असावे, घरात भांडणे, क्लेश, वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेने आणि देवी देवतांनी आपल्याला जे काही दिले आहे यासाठी आपण त्यांचे आभार मानायचे आहे.

Leave a Comment