दसरा होईल शुभ! या राशींना उत्तम आठवडा, मिळकत वाढेल; व्यापारात लाभच लाभ

मित्रानो, उद्यापासून नविन आठवडा सुरू होणार आहे. या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी – गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सिंहेत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात रविवारी दुर्गाष्टमी, सोमवारी महानवमी, मंगळवारी विजयादशमी (दसरा), बुधवारी पाशांकुशा एकादशी, गुरुवारी प्रदोष तर शनिवारी कोजागरी पौर्णिमा तसेच खंडग्रास चंद्रग्रहण आहे.

मंगळवारी पहाटे ४:२४ पासून पंचक सुरु होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे तीन दिवस पूर्ण काळ पंचक असून, शनिवारी सकाळी ७:३१ पर्यंत पंचक राहील. दसरा, नवरात्रीची सांगता, कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण याचा तुमच्यावर प्रभाव कसा असेल? जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य…

मेष: हा आठवडा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल. आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. कुटुंबात थोडा दुरावा येऊ शकतो, परंतु कामे मजबुतीने होतील. कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. असे असले तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. व्यापारातील पाऊले विचारपूर्वक उचलावी लागतील. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारीत तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती आपणास पसंत पडणार नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे.

वृषभ: हा आठवडा अनुकूल आहे. खोळंबलेली कामे झाल्याने आपण हर्षित व्हाल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानकपणे झालेल्या ह्या वाढीमुळे आपण काहीसे घाबरून जाल, परंतु धीर धरा. प्राप्तीत कपात संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. विनाकारण भांडण होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम केल्या नंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवते. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन: हा आठवडा चढ – उतारांचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाशी संबंधित विकार आपणास त्रस्त करू शकतात. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे आपणास महागात पडू शकते. व्यापारासाठी आठवडा फायदेशीर असला तरी आपला मानसिक ताण वाढेल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करण्याऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी त्यांच्यासमोर आव्हाने भरपूर असल्याने ते नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

कर्क: हा आठवडा चढ – उतारांचा आहे. व्यापारात तेजी येईल व काही नवीन ऑर्डर्स सुद्धा मिळतील. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. प्रॉपर्टीशी संबंधित कामात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील व त्याचा फायदा होईल. बँकेतील शिल्लक वाढेल. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. जोडीदाराची साथ आपणास प्रगती करण्यास प्रेरित करेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल, म्हणून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सिंह: हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. मानसिकदृष्ट्या बेचैन असल्याचे दिसून येईल. मनाप्रमाणे कामे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. प्रकृतीची थोडी काळजी घ्या व कोणताही वाईट विचार करू नका. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने होऊ घातलेली सर्व कामे अधिक जलद गतीने होतील. इतकेच नव्हे तर प्रलंबित कामे होऊ लागतील. नोकरीतील स्थिती चांगली असेल. तेथील परिस्थिती अनुकूल असल्याचा फायदा मिळेल. व्यापाऱ्यांना आठवडा अनुकूल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळेल. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकाग्रतेचा अभाव असल्याचे जाणवेल. तेव्हा सावध राहून खूप मेहनत करावी.

कन्या: हा आठवडा खूपच चांगला आहे. मनातील विचार बोलून दाखवू शकाल. विवाहितांचे जीवन चढ – उतारांसह वाटचाल करेल. व्यापारास अत्यंत फायदेशीर आहे. आपले कौशल्य व आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र कनिष्ठांपासून थोडे सावध राहावे लागेल. ते काही त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होऊ शकतो.

Leave a Comment