हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. शास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णूंची पूजा-आराधना करणं शुभ मानलं जातं. यंदा तीन वर्षांनंतर अधिक महिना आला आहे. त्यामुळे यंदाची 1 ऑगस्ट रोजी असणार श्रावण अधिक मास पौर्णिमा खूप खास असणार आहे.
या दिवशी श्री विष्णूंची केलेली उपासना अधिक लाभदायक सिद्ध होईल. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. तसेच या दिवशी स्नान, दान करणं देखील अत्यंत लाभकारी मानले जाते.
श्रावण अधिक मास पौर्णिमा 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.
पौर्णिमा प्रारंभ : पहाटे 03:51 वाजल्यापासून
पौर्णिमा समाप्ती : सकाळी 12:01 वाजेपर्यंत
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही नदीमध्ये स्नान करा. जवळपास नदी नसल्यास घरीच पाण्यात गंगा जल टाकून स्नान करा.
त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
त्यानंतर घरातील देवी-देवतांची पूजा करा.गरीब, गरजू लोकांना दान द्या.
या दिवशी शक्य असल्यास घरामध्ये श्री सत्य नारायणाची पूजा करा आणि कथेचे वाचन करा.
तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण मंत्राचा जप करा.
श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मींची देखील पूजा करा.