पावसाळ्यात शरीरात पेशींची कमतरता जाणवतेय? ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश!

मित्रांनो, देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. पावसामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशा विषाणूजन्य संसर्गाच्या वाढीशी लढण्यासाठी पावसाळ्यात पेशींची संख्या वाढवण्याची गरज आहे. पेशींची संख्या कमी झाल्यामुळे अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे पेशी आवश्यक पातळीपेक्षा कमी होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

विशेषत: डेंग्यूने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी पेशींची संख्या प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे कारण, पेशींची संख्या २० हजाराच्या खाली गेल्यास, अंतर्गत रक्तस्त्राव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशींची संख्या प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे.

पेशींची संख्या योग्य राखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाणे खूप आवश्यक आहे. आले, हळद, लसूण किंवा आवळा घातलेले पदार्थ खाण्याची सल्ला त्या देतात. शाह, सांगतात, तुम्ही या पदार्थांपासून काढा बनवू शकता आणि तो दररोज पिऊ शकता.

पावसाळ्यात तुमची व्हिटॅमिन D3 आणि B12 पातळी तपासण्याची शिफारस केली कारण ते मोठ्या प्रमाणावर संसर्ग आणि आजारांमुळे कमी होऊ शकतात. जर ते शरीरात पाहिजेत त्यापेक्षा कमी असतील तर, या ऋतूमध्ये तुम्ही स्वतःला निरोगी आणि फिट बनवण्यासाठी पूरक आहाराचा समाविष्ट करु शकता. गरम जेवण खाण्याचा प्रयत्न करा कारण जे तुम्हाला संक्रमण होण्यापासून सुरक्षित ठेवेल.

बाजरी तुमचे आरोग्य चांगले आणि रक्ताभिसरण राखण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. या हंगामात आटा आणि ब्रेड सारखे पदार्थ तुम्हाला भरपूर कार्बोहायड्रेट पुरवण्यासाठी पुरेसे नसतात, म्हणून स्वतःला योग्य कार्बोहायड्रेट युक्त जेवणासाठी तुम्ही बाजरी खाण्याचा विचार करा. दरम्यान, या काळात पेशींची संख्या कमी होत असेल तर, परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून ताबडतोब तज्ज्ञाची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a Comment