मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी या येतच असतात आणि आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करीत असतो. परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही. म्हणजेच त्या अडचणी आपल्या कमी होत नाहीत. तसेच सतत काही ना काही संकटे, समस्या या उभ्या राहतात. तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत सांगणार आहे.
हे अकरा गुरुवारचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहेत. तर हे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे? हे आपण आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत हे कोणत्याही गुरुवारपासून चालू करायचे आहे.
यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही. तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती समोर बसायचे आहे. दिवा अगरबत्ती आपली विधिवत दररोजची देवपूजा आहे ही देवपूजा करून घ्यायचे आहे.
नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, संकटे असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या इच्छा स्वामींना सांगायचे आहेत आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे.
म्हणजेच या उपवासामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे नाही आणि तुम्ही गुरुवारचा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे.
गुरुवारच्या व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामीं समोर बसून प्रार्थना करायचे आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे.
असे तुम्हाला 11 गुरुवार करायचे आहेत. जर तुम्हाला अकरा गुरुवरच्या या व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे. त्या दिवशी तुम्ही स्वामीना प्रार्थना करायची नाही किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही. फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार ते आपल्या अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये अजिबात धरायचा नाही.
तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून परत तुम्ही आपले हे व्रत चालू ठेवू शकता. असे तुम्हाला सलग अकरा दिवस करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवारच्या व्रतामध्ये कोणतेही प्रकारची अडचणी येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे. जर तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत अगदी मनोभावे केला तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील, अडचणी असतील, समस्या असतील या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील.
तुम्हाला देखील स्वामी समर्थांचे अनुभव येतील. तर अशी ही स्वामींचे तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत अवश्य करून पहा. तुमच्या जीवनातून सर्व अडचणी दूर होतील आणि इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील.