मित्रांनो, अनेक महिलांना आणि पुरुषांना हातात किंवा गळ्यात दागिने घालण्याची हौस असते. सोन्याचे, चांदीचे, प्लॅटिनमचे असे वेगवेगळ्या धातूचे दागिणे परिधान केले जातात.या धातूंपैकी आपण चांदीच्या दागिन्यांविषयी बोलणार आहोत. कुठल्या बोटात नेमकी चांदीची अंगठी घालावी याबाबत आज आपण जाणून घेऊया.
पुराणात असे म्हटले आहे की चांदी धातूची निर्मिती भोलेनाथांच्या डोळ्यांतून झाली आहे. म्हणून ती परिधान केल्याने बरेच फायदे होतात. जिथे चांदी असेल तिथे वैभव मोठ्या प्रमाणावर वास करते. ज्योतिष्यांच्या मते, चांदी हा नऊ ग्रहांपैकी शुक्र आणि चंद्र यांच्याशी जोडलेला धातू आहे. चांदीचे शरीराला आरोग्यदायी फायदे देखील आहे.
कुठल्याही गुरुवारी दिवशी रात्री चांदीची अंगठी पाण्यात घालून ती रात्रभर त्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूच्या पायाजवळ अंगठी ठेवून त्याची पूजा करा. पूजा करून झाल्यानंतर त्या अंगठीला चंदन लावा, अक्षता चढवून दिवा दाखवून त्याची पूजा करा. त्यानंतर अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत घालावी.
चांदीची अंगठी परिधान केल्याने शुक्र व चंद्राचा आपल्यावर प्रभाव राहातो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते आणि डाग दूर होतात. चांदीची अंगठी परिधान केल्याने डोक शांत राहाते. त्यामुळे तुमचे रागावरही नियंत्रण राहाते.
संधिवात, कफ, सांधे किंवा हाडे यांच्याशी संबंधित काही समस्या आल्यास चांदीची अंगठी परिणामकारक ठरते.
ज्या लोकांना चांदीची अंगठी आवडत नाही त्यांनी चांदीची चैन करून गळ्यात घालावी. हे शरीरात वात, कफ आणि पित्ताचा समतोल राखते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण आपल्या जीवनात चांदीचा वापर केला पाहिजे. त्याचे बरेच फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील.