यावर्षी श्रावणी सोमवार किती असतील? कधी सुरू होणार श्रावण महिना? सविस्तर माहिती

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव अगदी आनंदाने साजरी केले जातात. म्हणजेच प्रत्येक सणाचे वेगळेच महत्व आपल्याला पाहायला मिळते. आपण प्रत्येकजण अनेक प्रकारचे उपवास हे देखील करीत असतो. प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. तर आपण आज श्रावण सोमवार कधी सुरू होणार आहे तसेच यावर्षी श्रावण सोमवार किती आहेत? याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते. तसेच या महिन्यांमध्ये अनेक प्रकारचे व्रत उपवास आराधना देखील अनेक भक्त शिव मंदिरात जाऊन तसेच घरामध्ये देखील करीत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना देखील करीत असतात. तर यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये श्रावण महिना एक नव्हे तर दोन महिन्यांचा असणार आहे आणि साठ दिवस आपल्याला भगवान शंकरांची पूजा करण्याची संधी मिळणार आहे. तर शास्त्रानुसार श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे. अनेक प्रकारचे अभिषेक देखील या श्रावण महिन्यामध्ये केले जातात

श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत हे खूपच विशेष असे मानले गेलेले आहेत. या महिन्यात सोमवारी उपवास केल्याने भोलेनाथ आपला वर प्रसन्न होतात. त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत बरेच जण करत असतात. तर श्रावणापासून सुरू होणारे सोळा सोमवार देखील अनेक जण करीत असतात. तर यावर्षी अधिक मास असल्याने श्रावण महिना हा दोन महिन्यांचा असणार आहे आणि यावर्षी श्रावण महिना हा दोन जुलैपासून सुरू होणार असून तो 31 ऑगस्टला संपणार आहे.

तर यावर्षी श्रावण सोमवार हे आठ असणार आहे. म्हणजेच पहिला सोमवार हा 10 जुलैला तर दुसरा सोमवार 17 जुलैला तिसरा सोमवार 24 जुलैला चौथा सोमवार 31 जुलैला तर पाचवा सोमवार सात ऑगस्टला सहावा सोमवार हा 14 ऑगस्ट ला तर सातवा सोमवार 21 ऑगस्ट आणि आठवा सोमवार हा 28 ऑगस्ट ला असणार आहे.

तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही देखील या सोमवारचे व्रत जर केला तर यामुळे भगवान शंकर नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शंकरांना पाण्यासोबत जर बेलपत्र, धातूरा, शमीची पाने इत्यादी जर अर्पण केले तर हे खूपच शुभ मानले गेलेले आहे. तसेच अनेक अविवाहित स्त्रिया त्यांना इच्छित वर मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत देखील करीत असतात.

तर तुमच्या देखील काही मनोकामना अपूर्ण राहिल्या असतील आणि त्या पूर्ण व्हाव्यात असे जर वाटत असेल तर तुम्ही देखील श्रावणातील या सोमवारचे व्रत आवश्यक करा. यामुळे भोलेनाथ नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना देखील नक्कीच पूर्ण करतील.

Leave a Comment