तुमच्यासोबत या गोष्टी होतात तर समजून जा स्वामींची दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे

मित्रांनो प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त सेवेकरी हे आहेतच. ते मनोभावे आणि श्रद्धेने ते स्वामींच्या सेवेमध्ये अगदी मग्न होऊन जातात. जेणेकरून आपले जीवनातील काही अडचणी असतील, संकटे असतील, काही इच्छा असतील तर या पूर्ण व्हाव्यात जर अडचण दूर व्हावेत यासाठी उपवास करीत असतात.

परंतु मित्रांनो काही वेळेस असे लोक म्हणतात की, मी एवढी देवपूजा करतो तरीदेखील माझ्या जीवनामध्ये अडीअडचणी येतच आहेत. मला स्वामींचे अनुभव येत नाही. तसेच देव आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे की नाही असे अनेक प्रश्न येत असतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टीवरून तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामी तुमच्याबरोबर आहेत.

स्वामींची एक दैवी शक्ती आपल्या सोबत आहे. ते आपल्याला अडचणीतून, संकटातून नक्कीच बाहेर काढतील. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबीयांवर सदैव असणार आहे. तर या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही घरातील देवपूजा करत असतात. सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस देव पूजा करीत असता किंवा संध्याकाळी दिवा लावत असता त्यावेळेस दिवा लावल्यानंतर हा दिव्याची जी वात असते ही वात एका सरळ रेषेमध्ये येऊन तिचा आकार मोठा झाला असेल म्हणजेच ही वात डावीकडे ही नाही आणि उजवीकडेही नाही बरोबर सरळ रेषेमध्ये येऊन तिचा प्रकाश हा मोठा झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत.

आपल्या अडीअडचणीमध्ये ते आपल्या सोबत राहणार आहेत. तसेच तुम्ही एखाद्या स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये दर गुरुवारी जात असाल आणि तेथे तुम्ही स्वामींची सेवा करीत असाल आणि तुम्हाला गुरुवारी काही शुभवार्ता कळेल किंवा काहीतरी चांगलं तुमच्या बाबतीत घडेल तर हा देखील संकेत स्वामी तुमच्या सोबत असल्याचा आहे.

म्हणजेच स्वामी तुम्हाला कायम आनंदी ठेवणार आहेत. तसेच तुम्ही ज्यावेळेस देवांचे ध्यान करत असता म्हणजेच एकांतात बसून तुम्ही देवांचे नामस्मरण ध्यान करत असताना त्यावेळेस तुम्हाला एकदम अचानकच एखादा सुगंधी वास आला तर त्यावेळेस तुम्ही समजून जा प्रत्यक्ष स्वामी तुम्हाला भेटावयास आलेले आहेत.

तर मित्रांनो वरील सांगितलेल्या काही गोष्टी आहेत की, ज्यावरून आपनाला समजते की, आपल्या सोबत स्वामींची दैवी शक्ती आहे. स्वामी आपल्या सोबत आहेत. ते आपल्या पाठीशी आहेत. आपल्या प्रत्येक अडचण संकटातून ते आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील. तुमचेही बाबतीत असे काही घडले असेल तर तुम्ही समजून जा की स्वामीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे.

Leave a Comment