अक्षय तृतीयाच्या दिवशी काही विशेष गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यात येईल आनंद……

भारतामध्ये प्रत्येक सण अगदी अत्साहामध्ये साजरा केला जाते. काही दिवसांमध्ये अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमच्या कर्माची फळ तुम्हाला मिळतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याला देखील विषेश महत्त्व दिले जाते. . या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनांमध्ये सकारात्मक गोष्टी घडतात असे मानले जाते की या दिवशी आपण अशी चांगली कृत्ये करावीत जी आपल्याला अनंत पुण्य प्रदान करतात आणि अशा पुण्यांमुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते. शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे हे या दिवशी दान करण्याइतकेच महत्त्वाचे मानले गेले आहे.

 

अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते. वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, अक्षय तृतीयेचा सण 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. अक्षय तृतीच्या दिवशी नेमकं काय दान करावे चला जाणून घेऊयात.

 

या गोष्टी दान करा. अक्षय तृतीयेला ‘या’ गोष्टी दान करा…

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा. त्यात पाणी किंवा साखर घाला आणि ते दान करा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीत चंद्राची स्थिती देखील मजबूत होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे आणि पैसे इत्यादी दान करणे चांगले आहे. यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात.

 

पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकता. असे केल्याने व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तसेच, या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार करू शकता.

 

या गोष्टी करणे टाळा…

अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे, कारण हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे, कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीचे पान तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्र पूजा करणे चांगले मानले जाते, त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी. या दिवशी सात्विक आहार घेणे, म्हणजे फळे, दूध आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे चांगले असते.

Leave a Comment