मानसिक ताण दूर करण्यासाठी रूद्राक्षाचे पाणी खरचं फायदेशीर ठरते का? नक्की जाणून घ्या…

आयुष्यात अनेकदा आपल्याला अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जिथे प्रत्येक मार्ग बंद वाटतो. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मानसिक शांती भंग होते आणि नकारात्मकता जीवनावर अधिराज्य गाजवू लागते. अशा वेळी, ज्योतिष आणि आध्यात्मिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. भगवान शिव यांच्या आवडत्या रुद्राक्षाचा वापर फक्त तो घालण्यापुरता मर्यादित नाही तर एका विशेष पद्धतीने पाण्यात टाकून पिणे देखील फायदेशीर मानले जाते. चला तर जाणून घेऊया की रुद्राक्षाचे पाणी कसे सेवन करावे आणि ते कोणत्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते आणि त्याचा नेमकं काय फायगा होतो.

 

रुद्राक्षाचे महत्त्व

 

रुद्राक्ष हा एक पवित्र आणि ऊर्जावान नैसर्गिक घटक आहे, जो भगवान शिवाचा आशीर्वाद मानला जातो. हे एका विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या फळापासून मिळते आणि वेगवेगळ्या स्वरूपात आढळते. प्रत्येक मुखी रुद्राक्षाची स्वतःची ऊर्जा आणि वैशिष्ट्ये असतात. आजकाल अनेकजण त्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये रूद्राक्ष धारण करतात. रूद्राक्ष धारण केल्यामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मत परिणाम होतो.

 

रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती, आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याचे पाणी पिण्याचेही अनेक फायदे आहेत? विशेषतः ४ आणि ६ मुखी रुद्राक्षाचे पाणी पिणे आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मानसिक ताण आणि चिंता यापासून मुक्तता – जर तुम्ही सतत ताणतणाव किंवा चिंताग्रस्त असाल तर रुद्राक्षाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने मन शांत होण्यास मदत होते. बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वाढवणे – ४ मुखी रुद्राक्षाचे पाणी पिल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. नकारात्मक उर्जेपासून संरक्षण – हे पाणी पिल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आत्मविश्वास वाढतो. आरोग्यात सुधारणा – जर कोणी बराच काळ आजारी असेल आणि उपचार अपेक्षित परिणाम देत नसेल, तर रुद्राक्षाचे पाणी आरोग्य सुधारू शकते. कामात यश – जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, तर रुद्राक्षाचे पाणी पिल्याने सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. नकारात्मक प्रभावाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या सुधारणेसाठी – जर एखादी व्यक्ती वाईट संगतीत पडली असेल, वाईट सवयींचा बळी असेल किंवा नकारात्मक वागणूक देत असेल, तर हे पाणी देऊन त्याची सुधारणा शक्य आहे.

 

रुद्राक्षाचे पाणी बनवण्याची पद्धत…. तांब्याच्या भांड्यात पाणी भरा. त्यात 4 किंवा 6 मुखी रुद्राक्ष ठेवा. रात्रभर असेच राहू द्या. पाणी गाळून सकाळी प्या. हे पाणी पिण्यापूर्वी ‘ओम ह्रीम नम:’ किंवा ‘ओम ह्रीम हं नम:’ या मंत्राचा जप करा. सकाळी आंघोळीनंतर पाणी पिण्याची सर्वात योग्य वेळ आहे. रविवारी हे पाणी पिणे टाळा. लक्षात ठेवा की रुद्राक्ष खरा असावा, अन्यथा त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.

 

रुद्राक्षाच्या पाण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

 

आवश्यकतेपेक्षा जास्त पिऊ नका – हे पाणी खूप ऊर्जावान आहे, म्हणून ते मर्यादित प्रमाणात (१ चमचा) सेवन करा. विशेषतः सोमवारी हे पाणी सेवन करा – हा दिवस भगवान शिवाचा आहे, म्हणून या दिवशी हे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे. इतर धार्मिक कार्यांसोबत याचा वापर करा – जर तुम्ही नियमितपणे शिवाची पूजा केली तर या पाण्याचा प्रभाव आणखी वाढतो. रुद्राक्षाच्या शुद्धतेची काळजी घ्या – फक्त खरा आणि शुद्ध रुद्राक्ष वापरा, अन्यथा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही.

Leave a Comment