प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते. आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडणार आहे? कोणत्या घटना घडणार आहेत? त्याचा काय परिणाम होणार आहे? हे जाणून घ्यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण एखाद्या भविष्यवेत्त्याकडे जातो. त्यातून आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांचा आपल्याला अंदाज येतो. जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांबाबत चर्चा होते. त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आघाडीवर असंत. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अशा अनेक भविष्यवाण्या केल्या की त्या नंतर खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. ज्यामध्ये अमेरिकेवर झालेला हल्ला, जपानमध्ये आलेली त्सुनामी, हिटलरचा मृत्यू अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. तर त्यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला. एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली आणि त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली असा दावा केला जातो. बाबा वेंगा काहीच पाहू शकत नव्हत्या, मात्र अशा अनेक घटना आहेत, ज्याचं भाकीत बाबा वेंगा यांनी त्या घटना घडण्यापूर्वीच सांगितलं होतं असा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी तिसर्या महायुद्धाचं देखील भाकीत केलं आहे.
बाबा वेंगा यांचं AI बद्दल भाकीत
बाबा वेंगा यांचं भाकीत चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जी भाकीत वर्तवली आहेत, त्यातील अनेक खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी कित्येक वर्षांपूर्वीच असं भाकीत केलं होतं की जगात असं तंत्रज्ञान येईल, जे डॉक्टरांपेक्षा अधिक गतीनं तुमच्या आजाराचं निदान करेल.2024 मध्ये AI चं तंत्रज्ञान जगात आलं, या तंत्रज्ञानामुळे बाबा वेंगा यांची ती भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. AI च्या नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बाबा वेंगा यांनी पुढे असंही म्हटलं होतं की हे जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानामुळे मानवाला काम करण्याची गरजच पडणार नाही. मात्र त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील होतील, त्यातून कोणाचीच सुटका होणार नाही.