वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात ज्याचा संपूर्ण जगावर आणि मानवी जीवनावर परिणाम होतो. एप्रिल आणि मे महिना ज्योतिषशास्त्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या दरम्यान मीन राशीमध्ये शनि, सूर्य, बुध, शुक्र आणि राहु एकत्र विराजमान होतात. या ग्रहांच्या संयोगाने पंचग्रही राजयोग निर्माण होते.
पंचग्रही राजयोगचा सर्व १२ राशींवर परिणाम पडतो. तीन राशींसाठी हा योग विशेष फायदेशीर राहणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ या.
मिथुन राशी
या राशीच्या लग्न भावात मंगळ आणि दहाव्या भावात पंचग्रही योग निर्माण होत आहे, जे करिअरसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात या लोकांची प्रगती होईल. गुरुवर्य आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. विदेश यात्रा किंवा व्यवसायात वृद्धी होऊ शकते. विवाह आणि प्रेम संबंधांसाठी वेळ उत्तम राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहीन. कौटुंबिक जीवना सुख लाभेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.
कन्या राशी
सातव्या भावात पंचग्रही योग निर्माण झाल्याने लव्ह लाइफ मजबूत राहीन. विवाहाचे योग निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो पण कोणत्याही वाद विवादापासून दूर राहा. आत्मविश्वास वाढणार. उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्याचे योग निर्माण होऊ शकतात. व्यवसायात धन स्थिती सुधारणार. पार्टनरशिपमध्ये असलेल्या व्यवसायात लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढणार.
मकर राशी
तिसऱ्या भावात पंचग्रही योग निर्माण झाल्याने सकारात्मक परिवर्तन दिसून येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे योग जुळून येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. शनिची साडेसातीचा प्रभाव संपुष्टात येईल. अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगारवाढ होऊ शकतो. मन प्रसन्न राहीन. कुटुंबात आई वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल. व्यवसायाला घेऊन विदेश यात्रेचे योग जुळून येतील.