प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.
पती-पत्नीमध्ये खरे प्रेम असेल तर कोणत्याही संकटातून ते सहज बाहेर पडू शकतात. प्रेम फक्त शब्द असू नये. प्रत्येक कृतीतून ते व्यक्त झाले पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यावर कोणत्या लहान-लहान गोष्टीमुळे मतभेद निर्माण होणार नाही.
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणखी एक तत्व आवश्यक आहे. इंद्रियांची पवित्रता वैवाहिक जीवन अधिक सुखी करणारे असणार आहे.
इंद्रियांची पवित्रता ठेवताना पती अन् पत्नी दोघांनी कोणत्याही बाहेरील आकर्षणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देवू नये. जर तुमचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही.
नातेसंबंधातील विश्वासाचा पाया मजबूत असतो तेव्हा बाह्य प्रभाव निष्क्रीय होतो. ही शुद्धता नातेसंबंधांना आंतरिक शांती आणि समाधान प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने ही शुद्धता गमावली आणि व्यभिचार केला तर तो केवळ त्याचे नातेच गमावत नाही तर त्याची मानसिक शांती देखील गमावतो.