‘या’ राशीच्या महिलांनी पायात का बांधू नये काळा धागा? जाणून घ्या कारण

सध्याच्या वेगवेगळ्या फॅशन ट्रेंडनुसार मुली, महिला पायात काळा धागा बांधत असतात. पायात काळा धागा बांधल्यामुळे नकारात्मकता दूर राहते आणि आपल्यावर कोणाची वाईट नजर पडत नाही… अशी मान्यता आहे. याच कारणामुळे अनेक मुली, महिला पायात काळा धागा बांधतात. ज्योतिष शास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने वाईट नजरेसोबतच शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. पण काळा धागा सर्वत मुली आणि महिलांसाठी फायदेशीर ठरत नाही. काही राशी अशा देखील आहेत, ज्यांनी पायात काळा धागा बांधणं अशुभ मानलं जातं. तर आज जाणून घेऊ कोणत्या राशीच्या मुली, महिलांना पायात काळा धागा बांधू नये.

 

कोणत्या राशीच्या मुली, महिलांनी पायात काळा धागा बांधू नये?

वृश्चिक राशी: ज्योतिष शास्त्रानुसार, वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ देव आहेत आणि मंगळ देवाला काळ्या रंगाचा तिरस्कार आहे… असं सांगितलं जातं. त्यामुळे वृश्चिक राशीच्या मुली किंवा महिलांना पायात काळा धागा बांधला असेल, तर त्यांनी मंगळ देवाच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे जीवनात अनेक अडचणी देखील येऊ शकतात… असं देखील सांगितलं जातं.

 

मेष राशी: मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या मुलींनीही काळा धागा घालू नये. मेष राशीच्या महिला, मुलींनी पायात काळा धागा बंधणं अशुभ मानलं जातं आणि यामुळे त्यांना जीवनात दुःख आणि अपयशांना सामोरे जावे लागू शकते.

 

कुंभ राशी: जर तुम्ही कुंभ राशीचे व्यक्ती असाल तर काळा धागा घालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कुंभ राशीच्या मुलींना काळा धागा धारण केल्याने नोकरीत प्रगती आणि जीवनात यश मिळते.

 

तूळ राशी: तूळ राशीच्या मुली आणि महिलांसाठी पायात काळा धागा बांधणं फार लाभदायक ठरु शकतं. तूळ राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो आणि शनीचा काळा रंग आवडतो. त्यामुळे या राशीच्या मुलींनी काळा धागा घातल्यास त्यांच्यासाठी खूप शुभ असते.

Leave a Comment