देवी लक्ष्मीचा वास कायम घरात असावा यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतो. देवीची मंत्र साधना, पूजा आरती सर्वकाही करत असतात. वास्तुशास्त्रानुसार काही नियमही पाळले जातात. घर स्वच्छ असलं की देवी लक्ष्मीचा घरात वास होतो. तसेच घरातील दारिद्र दूर होतो आणि सुख शांती लाभते. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी बरेच उपाय सांगितले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही वस्तु घरी ठेवल्या की देवी लक्ष्मीची कृपा होते. या वस्तु धन आकर्षित करतात असं वास्तुशास्त्र सांगतं. चला जाणून घेऊयात कोणत्या वस्तू घरात ठेवल्या की देवी लक्ष्मीची कृपा होते.
कवडी : देवी लक्ष्मीला कवडी अतिशय प्रिय आहे. देवी लक्ष्मी समुद्रकन्या आहे. त्यामुळे कवड्यांचा देवी लक्ष्मीशी नातं असल्याचं सांगितलं जातं. पाच कवड्या घेऊन त्याला हळदीचा टिळा लावावा आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवावा. ज्योतिषशास्त्रानुसार कवडी देवघरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
हळद : पैसे ठेवण्याच्या जागी हळदीची गाठ ठेवावी. यामुळे तिजोरी कायम भरलेली राहते असं वास्तुशास्त्र सांगतं. हळदीचा संबंध विष्णुंशी जोडला जातो. जिथे विष्णु तिथे पत्नी लक्ष्मी असं गणित आहे. त्यामुळे हळदीची गाठ कायम ठेवावी.
चांदीचं नाणं : चांदी हे शुक्र आणि लक्ष्मीशी निगडीत धातू आहे. त्यामुळे चांदी तिजोरीत ठेवल्याने भरभराट होते असं वास्तुशास्त्र सांगतं. चांदीच्या नाण्याला रोज कुंकू लावून पुन्हा आहे त्या ठिकाणी ठेवावं.
तुळशीचं रोप : हिंदू धर्मात तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते. घरात तुळस असल्यास देवी लक्ष्मीचा वास राहतो. तुळशीची नित्य नेमाने पूजा केल्याने देवशी लक्ष्मीची कृपा राहते.