‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असतो लीडरशिप गुण, मेहनतीच्या जोरावर बनतात धनवान

Lअंकशास्त्रामध्ये मूलांकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती सांगतो. आज आपण मूलांक १ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्मतारीख १, १०, १९ आणि २८ आहे त्यांचा मूलांक १ असतो. मूलांक १ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य देव असतो. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर सूर्याचा प्रभाव दिसून येतो. मूलांक १ असलेले लोक कसे असतात, त्यांचे व्यक्तिमत्व, वैवाहिक आयुष्यासह करिअर इत्यादी विषयी जाणून घेऊ या .

 

मूलांक १ असलेल्या लोकांचा स्वभाव

या लोकांमध्ये लीडरशिप क्षमता असते. या लोकांना स्वतंत्र रहायला आवडतं. त्यांना जीवनात स्पेस हवी असते. हे लोक कोणतीही गोष्ट खूप लवकर स्वीकारत नाही. ते स्वत:च्या मतावर ठाम असतात. पण अडचणीच्या वेळी ते घाबरत नाही आणि धीटपणे अडचणींचा सामना करतात. ते स्वभावाने खूप आत्मविश्वासू असतात पण अनेकदा त्यांचा आत्मविश्वास अहंकारात बदलतो ज्यामुळे त्यांना सहन करावा लागतो.

 

मूलांक १ असलेल्या लोकांचे करिअर

या मूलांकच्या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. जेव्हा त्यांना लीडरशिप मिळते तेव्हाच ते नोकरीमध्ये आनंदी असतात. व्यवसायात हे लोक खूप यशस्वी होतात. ते एकच एक काम करून कंटाळतात. त्यांना आयुष्यात नेहमी नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते.

 

मूलांक १ असलेल्या लोकांचे वैवाहिक आयुष्य

मूलांक १ असलेल्या लोकांचे १, २, ३, ५, ८ आणि ९ मूलांक असणाऱ्या लोकांबरोबर चांगले पटते. लव्ह पार्टनर आणि जोडीदार निवडताना हे लोक या सर्व मूलांकचा विचार करू शकतात. या लोकांची अरेंज मॅरेज होण्याची शक्यता जास्त असते त्यांना जोडीदाराकडून भरपूर प्रेम मिळते. जर मूलांक १ असलेले लोक जोडीदाराचा आदर करत असेल तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदते.

 

मूलांक १ असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती

या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते. ते वेळेनुसार आयुष्यात श्रीमंत होतात.

Leave a Comment