वास्तूशास्त्रानुसार, घरात भगवद्गीता ठेवल्याने आयुष्यात प्रगती होते. गीता वाचल्याने आत्मबळ वाढतं, ज्यामुळे व्यक्ती स्वत:च्या समस्या सोडवू शकतो.
हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये चांदीची नाणी शुभ मानली जातात. चांदीची नाणी चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं. चांदीची नाणी घरात ठेवल्याने मन शांत राहते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे चांदीचे नाणे ठेवा.
ज्योतिषशास्त्रानुसार,कवडीचा संबंध लक्ष्मी देवीसह आहे. कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे 5 कवड्यांवर हळदी लावावी आणि त्या मंदिरात किंवा देव्हाऱ्यात ठेवाव्यात.
हळदीचा संबंध भगवान विष्णुसह असल्याचं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास होतो.त्यामुळे धनलाभासाठी तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळदी ठेवावी.
ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फुलंही आवडतं. घरात गुलाबाचं रोपटं ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तूशास्त्रानुसार, घरात गुलाब ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते.