शनिवारी ‘या’ गोष्टी दान केल्यास आर्थिक चणचण होईल दूर…

हिंदू धर्मामध्ये शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारच्या दिवशी अनेक भक्त शनिदेवाची पूजा केली जाते. शनिवारी पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चांगले फळ आणि आयुष्यात प्रगती होण्यास मदत होते. शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतात आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होण्यास मदत होते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांमुळे तुमच्या आयुष्यातील घटना घडत असतात. तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होत नाहीत.

 

तुमच्या कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी पूजा केल्यामुळे दोष दूर होण्यास मदत होते. शनिवारी उपवास केल्यामुळे तुमची आयुष्यामध्ये प्रगती होते. शनिवारी काही वस्तू दान करणे अत्यंत फायदेशीर ठरते. शनिवारी वस्तू दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया शनिवारच्या दिवशी काय गोष्टी दान केले पाहिजेल ज्यामुळे तुम्हाला शनिदेवाचा आशिर्वाद मिळू शकतो.

 

शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात. याशिवाय शनिवारी काळे तीळ दान केल्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीतून आराम मिळण्यास मदत होते. यासोबतच शनिवारी मोहरीचे तेल दान करणे देखील शुभ मानले जाते. फक्त चुकूनही शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करू नये. जर तुम्ही शनिवारी गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा किंवा काळी उडीद यांसारखे धान्य गरिबांना दान केल्यास ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ते खूप शुभ मानले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. शनिवारी गरजू लोकांना लोखंडी भांडी दान करणे देखील शुभ मानले जाते. असे केल्यास तुम्हाला शनिदोषापासूनही आराम मिळू शकतो. यासोबतच शनिवारी लवंग आणि गूळ दान करून शनिदेवाची कृपा तुम्हाला लाभू शकते.

 

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

 

शनिवारी काही विशेष काम करणे अशुऊ मानले जाते, त्यानुसार शनिवारी केस आणि नखे कापणे टाळावेत. याशिवाय शनिवारी काही वस्तू जसे मीठ, लोखंडापासून बनवलेल्या वस्तू, चामडे, जोडे, काळे तीळ, काळे उडीद, झाडू, तेल आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू इत्यादी खरेदी करू नका.

Leave a Comment