फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…

 वसंत पंचमी, रथसप्तमी, महाशिवरात्री अशा विविध सणांची मांदियाळीच आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना सण, व्रत-वैकल्यांनी भरलेला असेल. तसेच या महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तनही होईल. चला तर मग फेब्रुवारीत येणाऱ्या सर्व सणांच्या आणि ग्रहांच्या राशी परिवर्तनाच्या तारखा जाणून घेऊ..

 

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष आणि सण

 

१ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- गणेश जयंती, विनायक चतुर्थी

२ फेब्रुवारी २०२५ (रविवार)- वसंत पंचमी

३ फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- स्कंद षष्ठी

४ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार)- रथ सप्तमी, नर्मदा जयंती

५ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- दुर्गाष्टमी

८ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- जया एकादशी

१० फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- सोमप्रदोष

१२ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- माघ पौर्णिमा

१६ फेब्रुवारी २०२५ (रविवार)- संकष्टी चतुर्थी

१९ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- छत्रपती शिवाजी महाराज जयंती

२० फेब्रुवारी २०२५ (गुरुवार)- गजानन महाराज प्रकट दिन

२२ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)- रामदास नवमी

२४ फेब्रुवारी २०२५ (सोमवार)- विजया एकादशी

२५ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार)- भौम प्रदोष

२६ फेब्रुवारी २०२५ (बुधवार)- महाशिवरात्री

२७ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार)- दर्श अमावस्या

Leave a Comment