चांगली वेळ येण्याचे हे 7 संकेत, तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर व्हा आनंदी

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उत्तर येत असतात. मग ती व्यक्ती कोणीही असे ना. यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ, म्हणून तर लोक बोलतात कि थोडं वेळ द्या सगळं काही ठीक होईल. अशातच वेळ ही खूप ताकदवान आहे. कारण प्रत्येक वेळेचा वेग नेहमी सारखा नसतो. त्यात एखादी वेळ माणसाला क्षणात त्याचे जीवन बदलून टाकते. तर वेळ ही राजाला मोठे पद आणि गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते, तेव्हा सगळीकडे निराशा असते. तसेच चांगली वेळ सगळीकडे आनंद पसरवत असते.

 

ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात चांगली वेळ किंवा वाईट वेळ येत असते तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात, पण कधी कधी तुम्हाला ही चिन्हं समजत नाहीत

 

शास्त्रांनुसार जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असेल तर अशा परिस्थितीत त्याला आधीच काही संकेत दिसू लागतात. त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे मिळतात. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे की वाईट हे कळू शकते. आज आम्ही तुम्हाला चांगली वेळ येण्याआधी येणाऱ्या संकेतांबद्दल सांगणार आहोत.चला जाणून घेऊयात.

 

चांगली वेळ येण्याची चिन्हे

१. गाय

 

जर तुमच्या घराच्या दारात गाय आली तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ तुमच्या घरात सुख-समृद्धी येणार आहे. अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी.

 

२. वाटेत माकड दिसणे

 

तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याच वेळी वाटेत तुमच्या उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे. तर दुसरीकडे सकाळी उठून पूजेचा नारळ पाहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षाव होणार आहे, हे समजून घ्यावे.

 

३. बाल्कनीत चिमणी येऊन बसणे

 

जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून किलबिलाट करत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दु:ख, त्रास चालू आहेत, ते दूर होणार आहेत आणि तुमची येणारी वेळ आनंदमय असणार आहे.

 

४. घोड्याची नाल मिळणे

 

वाटेत कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कधी घोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगले मानले जाते. शनिवार वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल आढळली तर ती सोबत ठेवावी.

 

५. फुलपाखरु दिसणे

 

सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानली जातात. आजूबाजूला अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे.

 

६. रुईचे झाड अंगणात वाढणे

 

जर तुमच्या घरासमोर रुईचे झाड वाढताना दिसले तर ते अतिशय शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे लवकरच चांगली वेळ येणार आहे .

 

७. हातामध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे

 

महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे. हे समृद्धीचे लक्षण मानले जाते.

Leave a Comment