वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य हे सर्वात मोठे ग्रह मानले जातात. ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य 5 जानेवारी रोज म्हणजेच उद्या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने लाभ दृष्टीचा शुभ योग जुळून येणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
लाभ दृष्टी योग कधी जुळून येणार आहे?
5 जानेवारी रोजी सकाळी 4 वाजून 03 मिनिटांनी सूर्य ग्रह आणि शनी ग्रह एकमेकांच्या 60 डिग्रीवर असणार आहेत. दोन्ही ग्रह तृतीया आणि एकादश चरणात स्थित आहेत. यामुळे त्रिएकादश योग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर लाभ दृष्टी योगदेखील जुळून येणार आहे. याचा लाभ 3 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा लाभ दृष्टी योग फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे दार खुले होतील. तसेच, तुमच्या धनवृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची नवीन ओळख निर्माण होईल. तसेच, तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद वाढेल. तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी लाभ दृष्टीचा उत्तम योग जुळू आला आहे. या काळात तुमच्या पत्तीत अपार वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, जर तुम्हाला घर खरेदी करायचं असल्यास त्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. जर तुम्हाला परदेशात फिरायला जायचं असल्यास तुम्ही तसा प्लॅन करु शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी लाभ दृष्टी योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.