सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेलचा ग्राहकवर्ग खूप आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत शानदार ऑफर घेऊन येत असते. अशातच जर तुम्हीही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण कंपनीने काही महिन्यांपूर्वी 5G सेवा सुरु केली आहे. अशातच आता तुम्ही मोफत अनलिमिटेड 5G डेटा तसेच अनलिमिटेड कॉलिंगचा घेऊ शकता. या प्लॅनचा लाभ तुम्हाला 90 दिवसांसाठी घेता येणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला या प्लॅनमध्ये इतर सुविधांचादेखील लाभ घेता येणार आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा प्रीपेड प्लॅन आहे.
90 दिवस मिळणार खूप फायदे
कंपनीचा हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येत असून किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 779 रुपये आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मिळत आहेत.
याशिवाय, कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. तसेच दैनंदिन डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 Kbps कमी होतो. यामध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध असून जर तुम्ही एसएमएस मर्यादा ओलांडली तर, स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आकारण्यात येतील. जर किमतीनुसार, विचार केला तर 779 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची दैनिक किंमत फक्त 8.60 रुपये आहे.
मोफत मिळणार अनलिमिटेड 5G डेटा
एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा, अपोलो 24|7 सर्कल मेंबरशिप, फ्री विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यूनसह अनेक बक्षिस देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की 779 रुपयांचे रिचार्ज कोणत्याही OTT लाभासह येत नाही.
परंतु हे लक्षात घ्या की अनलिमिटेड 5G डेटा वापरण्यासाठी, तुमच्याजवळ 5G फोन असावा, तसेच तुम्ही Airtel चे 5G नेटवर्क लाइव्ह असणाऱ्या भागात असले पाहिजे.