ज्योतिषशास्त्रात राहूला छाया आणि पापी ग्रह मानले जाते. या ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून तो २०२५ पर्यंत याच राशीत असेल. राहूला राशी परिवर्तन करण्यासाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी लागतो. दरम्यान, येत्या काही दिवसांत राहूचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. १६ ऑगस्ट रोजी तो उत्तरा भाद्रपदाच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करेल. राहूचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.
पंचांगानुसार, २७ नक्षत्रांपैकी उत्तरा भाद्रपदा हे २६ वे नक्षत्र आहे. राहू १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश करणार आहे आणि यामध्ये तो २ डिसेंबरपर्यंत राहणार आहे.
तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
वृषभ
राहूचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक कामात मित्रांची साथ मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात आकस्मिक धनलाभ होईल. त्यांच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे ते करता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे हे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ फळ देणारे ठरेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. व्यवसायात हवा तो लाभ होईल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. समाजात मानसन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींना राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचे अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. आकस्मिक धनलाभ होईल. समाजात मानसन्मान मिळेल. शत्रूंचा पराजय होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा