पुढचे ४ महिने नुसता पैसा! देवगुरु वक्री स्थितीत राहून ‘या’ राशींच्या व्यक्तींना करणार लखपती? बघा तुम्हाला आहे का ही संधी?

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये गुरु ग्रहाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. गुरुलाच बृहस्पति म्हटले जाते. बृहस्पति हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सर्वच ग्रह, ताऱ्यांना महत्त्व आहे. परंतु गुरू ग्रहाला विशेष महत्त्व आहे कारण त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. सर्व राशींसाठी गुरुची हालचाल, नक्षत्रपरिवर्तन, वक्री, उदय होणे महत्त्वाचे मानलं जाते. आता १२ वर्षांनंतर, गुरु वृषभ राशीत आहे आणि सरळ चालत आहे. गुरू ९ ऑक्टोबरला वक्री भ्रमण करणार आहे. तर गुरु ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मागे सरकेल. बृहस्पति सुमारे चार महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. अशावेळी गुरुच्या वक्री चालीमुळे काही राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरुच्या वक्री चालीचा कोणच्या राशींच्या व्यक्तींना फायदा होतोय. 

 

गुरु वक्रीमुळे ‘या’ राशींच्या लोकांना होणार धनलाभ?

मिथुन राशी (Gemini Zodiac)

गुरु ग्रहाची वक्री गती मिथुन राशीतील मंडळीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. तसेच नोकरीच्या नव्या संधीही याकाळात उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही कोणतेही पद देखील मिळवू शकता.

 

कर्क राशी (Cancer Zodiac)

बृहस्पति वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कर्क राशीच्या लोकांना व्यवसायातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम संबंधामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते.

 

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

गुरु वक्रीमुळे वृश्चिक राशीच्या मंडळींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक कामांमध्ये मोठं यश प्राप्त होऊ शकते. मुलाकडून कोणतीही आनंदाची बातमी तुमच्या कानी पडू शकते. या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

Leave a Comment