असे करा स्वामींचे अभिषेक, मनोकामना पूर्ण होतील!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामींची पूजा अर्चना सेवा करण्यामध्ये मग्न होऊन जातात. स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी आपण अनेक सेवा करीत असतो. तर स्वामी देखील आपल्या प्रत्येक भक्तांची आणि अडचणीतून सुटका देखील करतात. तसेच ते कायम भक्तांच्या पाठीशी देखील उभे राहतात. तर स्वामीचा अभिषेक हा कसा करायचा असे अनेक जणांना माहिती नसते.

आपणाला अभिषेक तर स्वामींचा करायचाच असतो परंतु हा अभिषेक कशा पद्धतीने करायचा याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो तसे तर अनेक भक्त हे मठांमध्ये केंद्रांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. तसेच स्वामींचे अभिषेक देखील करीत असतात. परंतु आपल्याला वेळेअभावी अनेक जणांना मठांमध्ये केंद्रामध्ये जाणे जमत नाही.

तर घरच्या घरी तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला स्वामींची मूर्ती आवश्यक आहे. तर ही मूर्ती चांदीची, पितळीची, तांब्याची कोणत्याही स्वरूपाची असली तरीही चालेल. तर सकाळी लवकर उठून आपण स्नान वगैरे आटोपून स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक ताट किंवा ताम्हण घ्यायचा आहे आणि त्या ताम्हनामध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे.

एका वाटीमध्ये दूध घ्यायचे आहे. तर एका वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे आणि नंतर स्वामींची मूर्ती ताम्हनामध्ये ठेवल्यानंतर एक चमचा दूध घेऊन स्वामींच्या मूर्तीवर सोडायचे आहे आणि हे दूध सोडत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे आहे. म्हणजेच अकरा वेळा तुम्हाला दूध चमच्याने सोडायचे आहे आणि अकरा वेळा दूध सोडताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रत्येक वेळेस म्हणायचे आहे.

दूध सोडून झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस पाणी सोडायचे आहे आणि हे पाणी सोडत असताना देखील तुम्हाला अकरा वेळा स्वामी श्री स्वामी समर्थ असे म्हणत राहायचे आहे. नंतर पाणी सोडून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्वच्छ पाण्याने स्वामींची मूर्ती धुवून घ्यायची आहे आणि नंतर हिना आत्तर स्वामींच्या मूर्तींना लावायचे आहे. अष्टगंध लावायचा आहे.

अक्षदा वाहायचे आहेत. दिवा, अगरबत्ती लावून स्वामींची पूजा करायची आहे. आरती करायची आहे. नंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तसेच तुम्ही साखरेचा नैवेद्य देखील दाखवला तरीही चालतो. तर अशा पद्धतीने स्वामींची पूजा तुम्ही करायची आहे. म्हणजे स्वामींचा अभिषेक तुम्ही करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर प्रसाद दाखवल्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थांचा नाम जप करायचा आहे किंवा तुम्ही अकरा वेळेस देखील श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप केला तरीही चालतो.

तर अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करून आपण स्वामींना प्रसन्न करून घेऊ शकतो. स्वामींची अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर स्वामी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावर कायम राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वामींचा अभिषेक घरच्या घरी करू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment