भावाच्या भाग्योदयासाठी आणि प्रगतीसाठी राशीनुसार बांधा ‘या’ रंगाची राखी; संपूर्ण वर्ष जाईल आनंदात

हिंदू धर्मामध्ये बहीण-भावाच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळेच रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी योगायोगाने श्रावणातला तिसरा सोमवारही आहे.

या शुभ दिनी भावाला राखी बांधण्यासाठी सगळेच जण शुभ मुहूर्त पाहतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? रक्षाबंधनाला भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधणेदेखील खूप शुभ मानले जाते. भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधल्यास, त्याच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते; तसेच यामुळे बहीण-भावाचे नातेही अधिक घट्ट होते.

 

भावाला त्याच्या राशीनुसार बांधा राखी

मेष

 

तुमच्या भावाची रास जर मेष असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधा. कारण- मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. लाल रंग मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी मानला जातो. त्यामुळे भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धीचे आगमन होईल.

 

वृषभ

 

तुमच्या भावाची रास वृषभ असल्यास त्याला तुम्हा हलक्या गुलाबी किंवा भडक गुलाबी रंगाची राखी बांधा. कारण- वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून, शुक्र गुलाबी रंगाचे प्रतिनिधित्व करतो. या रंगाची राखी तुमच्या भावाला नक्कीच लाभदायक ठरेल.

 

मिथुन

 

बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असून, या राशीला हिरवा रंग फायदेशीर ठरतो. हा रंग भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती आणण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकेल.

 

कर्क

 

तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला पांढऱ्या रंगाची राखी बांधावी. कारण- कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्र हा पांढऱ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो.

 

सिंह

 

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची रास सिंह असेल, तर त्याला केशरी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाचा भाग्योदय होण्यास मदत होईल.

 

कन्या

 

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. तुमच्या भावाची रास कन्या असेल, तर त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी. भावाच्या जीवनात ज्ञान सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल.

 

तूळ

 

तुमच्या भावाची रास तूळ असल्यास त्याला तुम्ही गुलाबी किंवा चंदेरी रंगाची राखी बांधा. या रंगाची राखी तुमच्या भावाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यात मदत करील.

 

वृश्चिक

 

मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा स्वामी आहे. तुमच्या भावाची रास वृश्चिक असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी. या रंगाची राखी भावाला अनेक अडचणींपासून मुक्त करील.

 

धनू

 

गुरू ग्रह धनू राशीचा स्वामी आहे. तुमच्या भावाची रास धनू असेल, तर त्याला केशरी किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी. या रंगाची राखी भावाच्या जीवनात सुख आणि समाधान आणण्यासाठी फायदेशीर ठरेल.

 

मकर

 

शनी ग्रह मकर राशीचा स्वामी आहे. तुमच्या भावाची रास मकर असल्यासम त्याला गडद निळा किंवा निळ्या रंगाच्या शेडमधील रंगांचा समावेश असलेली राखी बांधावी. त्यामुळे भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल.

 

कुंभ

 

शनी ग्रह कुंभ राशीचा स्वामी आहे. तुमच्या भावाची रास जर कुंभ असल्यास त्याला निळ्या रंगाची राखी बांधावी. त्यामुळे भावाला भविष्यातील निर्णय घेण्यास मदत होईल.

 

मीन

 

गुरू ग्रह मीन राशीचा स्वामी आहे. तुमच्या भावाची रास मीन असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. या रंगाच्या राखीमुळे भावाला सुखी, समाधानी आणि दीर्घायुष्य प्राप्त होईल.

Leave a Comment