१२ दिवसांनंतर चांदीच चांदी; शुक्राच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार भौतिक सुख अन् पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला भौतिक सुख, पैसा, धन, संपत्ती, आकर्षण, ऐश्वर्याचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. सध्या शुक्र चंद्राच्या कर्क राशीत विराजमान असून, ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे; जो २४ ऑगस्टपर्यंत या राशीमध्ये विराजमान असेल. या काळात शुक्राची शुभ स्थिती काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल.

 

शुक्राचा सिंह राशीत प्रवेश करणार मालामाल (Venus Transit 2024 in Leo)

मेष

 

शुक्राचा सिंह राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात घरात सुख-समृद्धीचे वातावरण असेल. आपल्या जोडीदाराबरोबर डेटवर जाल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

 

मिथुन

 

शुक्राचा सिंह राशीतील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींनाही खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. विदेशी जाण्याचे योग आहेत. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते चांगले राहील.

 

सिंह

 

शुक्राचा सिंह राशीतील प्रवेश सिंह राशीधारकांना खूपच शुभ फलदायी असेल. कार्यक्षेत्रात हवे तसे यश मिळेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. धार्मिक कार्यात मन रमेल. दूरचे प्रवास घडतील.

Leave a Comment