ज्योतिषशास्त्रात मंगळाची उलटी चाल खूप महत्त्वपूर्ण मानली जातात; ज्याचा प्रभाव १२ राशीपैंकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो. पंचांगानुसार ६ डिसेंबर २०२४ रोजी मंगळ कर्क राशीमध्ये वक्री होईल आणि २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तो वक्रीच राहील. मंगळाची ही चाल काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.
मंगळ ग्रह कर्क राशीत होणार वक्री (Mangal Vakri 2024)
मेष
मंगळाची वक्री चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल, या काळात आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. तुमच्यात साहस आणि आत्मविश्वास निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची वक्री चाल खूप सकारात्मक परिणाम देणारी असेल. या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.
मकर
मंगळाची वक्री चाल मकर राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप शुभ फळ देणारी ठरेल. हा काळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम ठरेल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.