वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती, असे म्हटले जाते. मंगळ ग्रह सुमारे १८ महिन्यांनंतर राशिबदल करतो. त्यात मंगळ १२ जुलैला राशिबदल करणार आहे. मंगळ पाच दिवसांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी हा राशिबदल होणार आहे.
वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह आणि मंगळ यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि त्यांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. तर मग चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी; ज्यांना या मंगळ ग्रहाच्या राशिबदलाचा फायदा होऊ शकतो.
मेष
मंगळ ग्रहाचे संक्रमण मेष राशीधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, व्यावसायिक त्यांच्या कौशल्याचा फायदा घेत चांगला नफा मिळविण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमच्या घरगुती सुखसोई वाढतील. तसेच व्यावसायिकांना यावेळी कर्जाचे पैसे मिळू शकतात. या काळात तुमच्या संवादात सुधारणा दिसून येऊ शकते. त्यामुळे लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. नोकरदारांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला पदोन्नती मिळण्याचीदेखील शक्यता आहे.
कर्क
मंगळाचे संक्रमण कर्क राशीसाठी शुभ ठरू शकते. या काळात मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. तसेच, व्यावसायिक व्यवसायविस्ताराचे नियोजन करण्यात यशस्वी होऊ शकतात. ते तयार केलेल्या योजनांद्वारे चांगला नफा मिळवू शकतात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्यासाठी संपत्तीचे नवीन स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे काम बघूनच तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक
मंगळाचा राशिबदल वृश्चिक राशीधारकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. दुसरीकडे जर नोकरदार लोकांनी नोकरी बदलण्याची योजना आखली असेल, तर त्यांना त्या दिशेने चांगले यश मिळेल.
तसेच, यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळू शकते. तसेच, या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तुमच्या घरगुती सुखसोईंमध्ये वाढ होईल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढू शकतो. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. तुम्ही दिवसभर जे काम करता, त्यात तुमचे मन रमेल. तसेच, कामाप्रति तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल.