वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’ राशींना लागणार बंपर लॉटरी !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

शनिदेव हा कर्मदाता आहे. तो जाचकाला त्याचा कर्मची फळं देतो. तुमचे कर्म चांगले असेल तर शनिदेव त्याची अपार माया तुम्हाला देतो. पण तुमचे कर्म वाईट असेल तर शनिदेव नाराज होतो आणि तु्म्हाला शिक्षा देतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी वक्री स्थितीत येणार आहे. त्यामुळे शनीदेव काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 17 जूनला शनि पुन्हा एकदा आपला मार्ग बदलणार आहे. या स्थिती तीन मोठे आणि शुभ राजयोग जुळून येतं आहे.

राजयोगाचा ‘या’ राशींवर पडणार शुभ प्रभाव
वृषभ (Taurus)
राजयोगाचा या राशीला फलदायी ठरणार आहे. वृषभ या राशीच्या शासक ग्रह हा शुक्र आहे आणि तो शनिदेवाचा मित्र आहे, असं म्हणतात. त्यामुळे या राशीला सर्वाधिक लाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत.

सिंह (Leo)
राजयोगामुळे या राशीला अचानक धनलाभ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाची मागणी येणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रकृतीमध्ये सुधारणा होईल.

वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांसाठी राजयोग आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. गाडी आणि मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर सहज ती गोष्ट शक्य होणार आहे. वडिलोपार्जित मालमतेत्तून फायदा होणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ उत्तम असणार आहे.

तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी राजयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. नशिब काय असतं त्याचा अनुभव या लोकांना येणार आहे, कारण नशिब तुम्हाला उत्तम साथ देणार आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्वरित करा. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न असणार आहे.

कुंभ (Aquarius)
शनिदेव सध्या कुंभ राशीतच आहे, त्यामुळे राजयोगाचा सर्वाधिक फायदा या राशीला होणार आहे. मोठ्या मोठ्या लोकांसी तुमची ओळख होईल. ही ओळख भविष्यात तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आजपर्यंत होत नसलेली प्रत्येक काम सहज मार्गी लागणार आहेत. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती असणार आहे.

Leave a Comment